Saturday, June 29, 2024

जॉनी लिव्हरने किंग खानचे केले तोंडभरुन कौतुक तर सलमानला म्हणाला…

बॉलिवूडमधील विनोदाचा बादशाह जॉनी लिव्हर (johny lever)सध्या चर्चेत आला आहे. अनेक वर्षापासून जॉनि लिव्हर आपल्या विनोदी कौशल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. नेहमीच आपल्या विनोदी स्वभावाने चाहत्यांना हसवणाऱ्या जॉनी लिव्हरने एका मुलाखतीदरम्यान इंडस्ट्रीमधील काही अनुभव शेअर केले आहते. यावेळी जॉनी लिव्हरने किंग खानचे तोंडभरुन कौतुक केले तर त्याने यावेळी सलमान खानच्या स्वभावाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या.

सिनेसृष्टीत जॉनी लिव्हरने शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमारयांच्यासह अनेक सुपरस्टारसोबत काम केले आहे. एका मुलाखतीदरम्यान जॉनी लिव्हरने काही खास किस्से सांगितले आहेत. जॉनी लिव्हर म्हणाला, शाहरुख खानसोबत मी बाजीगर त्यापूर्वी ‘राजू बन गया जेंटलमैन’ मध्ये काम केलं आहे. पण तेव्हा शाहरुख प्रसिद्ध नव्हता. त्यावेळी शाहरुखपेक्षा लोक अधिक मला ओळखत होते.

जॉनी लिव्हर पुढे म्हणाला, आत्तापर्यंत शाहरुख सारखा मेहनती माणूस मी पाहिलेला नाही. अक्षय कुमार आणि शाहरुख हे दोघेही खुप मेहनती आहेत. सुरुवातीला शाहरुखला फायटिंग येत नव्हती ना डान्स. जेव्हा मी ‘करण अर्जुन’ या चित्रपटात सलमान खान आणि त्याच्यासोबत काम केले तेव्हा सलमान परफेक्ट टेक देत होता. तर शाहरुखमुळे सतत रिटेक मिळत होता. मात्र, शाहरुखने स्वतःवर मेहनत घेतली आणि तो आता सुपरस्टार झाला आहे. आता तो डान्स आणि फायटिंगमध्ये आपली कमला दाखवतो.

सलमानबद्दल बोलताना जॉनी लिव्हर म्हणाला तो खुप चंचल आहे. सलमानला खुप निवांत राहायला आवडते तो कोणतंही टेन्शन घेत नाही. तो नेहमी स्वतःच्याच जगात वावरत असतो. एक चांगला व्यक्ती आहे. पण शाहरुख आपल्या कामाबद्दल खुप सिरियस असतो. जी भूमिका साकारणार आहे त्याची सर्व खोलवर माहित घेत असतो. या उटल सलमान असल्याचे जॉनी लिव्हरने यावेळी सांगितले.

जॉनी लिव्हरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, २०२३ मध्ये पहिल्यांदाच मुलगा जेसी लिव्हर स्क्रिन शेअर करताना दिसला होता. २१ जुलैला प्रदर्शीत झालेल्या ‘अफलातून’ या चित्रपटात जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर वडील आणि मुलाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला आले होते. जॉनी लिव्हर ‘नवाब साहब’ च्या भूमिकेत दिसला तर त्यांचा मुलगा ‘आफताब’ची भूमिका जेसी लिव्हर याने साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

ना विक्की ना सासर अंकिताने आजी अन् आईसोबत साजरा केला व्हॅलेंटाईन डे; घटस्फोटाच्या चर्चेला उधाण
‘तुझ्यात ते टॅलेंट नाही जे….’;मौनी रॉयने शेअर केला अभिनयाचा खडतर प्रवास

हे देखील वाचा