कॉमेडी किंग जॉनी लिव्हरच्या मुलांचा व्हिडीओ पहिल्यांदाच आला जगासमोर, ‘या’ गाण्यावर केला अफलातून डान्स


बॉलीवूडमधील सगळ्यात नावाजलेला विनोदी अभिनेता म्हणजे जॉनी लिवर. जेव्हा जेव्हा विनोदी कलाकारांबद्दल बोलले जाते, तेव्हा जॉनी लिवर यांचं नाव नेहमीच टॉप लिस्टमध्ये येतं. ते आता भलेही चित्रपटात काम कमी करत असले तरीही सोशल मीडियावर मात्र ते मोठ्या प्रमाणत सक्रिय असताना दिसतात. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा ‘जेसी लिवर’ आणि मुलगी ‘जेमी लिवर’ हे देखील सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.

जॉनी यांचा मुलगा जेमी हा देखील एक उत्कृष्ट विनोदी कलाकार आहे. नुकताच या तिघांचा एक कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जॉनी आपल्या मुलांसोबत डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये जॉनी लिव्हर हे आपल्या दोन मुलांसोबत ‘डोन्ट टच मी’ या गाण्यावर डान्स करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी असे कॅप्शन टाकले आहे की, ” डोन्ट टच मी, जोपर्यंत तुम्ही वॅक्सिन घेतली नाही.”

या व्हिडिओमध्ये जॉनी यांची त्यांच्या मुलांसोबत खूप चांगली मैत्री पाहायला मिळते. या व्हिडिओ मधून अजुन गोष्ट समोर आलीय ती म्हणजे, जॉनी या व्हिडिओमध्ये खूपच फनी एक्सप्रेशन देताना दिसत आहे.

ही पहिलीच वेळ आहे जेव्हा जॉनी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसोबत व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा या डान्स व्हिडिओला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

जॉनी लिव्हर याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ते शेवटचे डेविड धवन यांनी दिग्दर्शित केलेला ‘कुली नंबर 1’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला होते. या चित्रपटामध्ये वरुण धवन, सारा अली खान, परेश रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.


Leave A Reply

Your email address will not be published.