Wednesday, July 3, 2024

जुनियर एनटीआरने पूर्ण केले सिनेसृष्टीमधे २५ वर्ष पूर्ण, आरआरआर सिनेमाने दिली त्याला पॅन इंडिया ओळख

मनोरंजनविश्व हे असे क्षेत्र आहे ज्याचा भरवसा नाही. इथे आज यश जरी मिळत असले तरी उद्या यश मिळेलच आणि मिळालेले यश टिकेलच असे अजिबात होत नाही. या क्षेत्रात अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यांनी अमाप यश, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवली मात्र या गोष्टी टिकल्या नाही आणि आज ते कलाकार इंडस्ट्रीपासून लांब त्यांचे जीवन व्यतीत करत आहे. अशा या बेभरवशी क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवून ठेवणे आणि यश मिळवणे खूपच मोठे काम आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर मनोरंजनविश्वात २५ वर्ष यशस्वी पूर्ण करणे म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी कोणत्याही कलाकाराला या क्षेत्रात २५ वर्ष पूर्ण होणे म्हणजे कोणत्याही मोठ्या उपलब्धीपेक्षा कमी नसते. दाक्षिणात्य सुपरस्टार आणि आता पॅन इंडिया स्टार झालेला जुनियर एनटीआरला अभिनयाच्या क्षेत्रात नुकतेच २५ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जुनियर एनटीआरचीच चर्चा आहे. नुकताच त्याचा आणि रामचरणचा आरआरआर हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, तो बॉक्स ऑफिसवर ताबडतोड कमाई करत आहे. संपूर्ण जगात या सिनेमाची तुफान क्रेझ दिसून येत आहे. जुनियर एनटीआरने नुकतेच तेलगू सिनेसृष्टीत २५ वर्ष पूर्ण केले आहेत. ११ एप्रिल १९९७ साली त्याचा ‘रामायणम’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. याच ‘बाला रामायणम’ सिनेमातून जुनियर एनटीआरने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. डान्सर असणाऱ्या जुनियर एनटीआरने चित्रपटाच्या कास्टिंग टीमचे लक्ष वेधून घेतले आणि त्याला या सिनेमात रामाची भूमिका मिळाली.

‘शकुंतलम’चे दिग्दर्शक असणाऱ्या गुणशेखर या पौराणिक सिनेमात मेगाफोनचा वापर केला, जयंत जुनियर एनटीआरने रामची भूमिका साकारली होती. या सिनेमाला १९९८ साली दोन नंदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. जुनियर एनटीआरची भूमिका असणारा ‘बाला रामायणाम’ सिनेमात ३००० पेक्षा अधिक मुलांचा समावेश होता. या सिनेमाची निर्मिती शब्दालय थियेटरने केली होती.

जुनियर एनटीआरने त्याच्या २५ वर्षाच्या शानदार करिअरमध्ये ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून, यातले बहुतेक सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. या सिनेमांपैकी ‘आदि’, ‘सिम्हाद्री’, ‘टेम्पर’, ‘जनथा गैराज’, ‘अरविंदा समीथा वीरा राघव’ आदी चित्रपटांनी तुफान लोकप्रियता मिळवली. जुनियर एनटीआरचा नुकताच प्रदर्शित झालेला एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआर हा सिनेमा जुनियर एनटीआर आणि एस एस राजामौली यांचा एकत्र चौथा सिनेमा आहे. लवकरच जुनियर एनटीआर प्रश्नत निल यांच्या एका सिनेमात आणि बार कोराताला शिव दिग्दर्शित ‘एनटीआर 30’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा