एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीपासून या चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करण्यास सुरूवात केली होती. सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या यशाबरोबरच अभिनेता ज्युनिअर एनटीआरच्या दमदार भूमिकेचे कौतुक होत आहे. ज्युनिअर एनटीआरने(Jr.NTR) या चित्रपटातील अभिनयाने त्याच्या कसदार अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळेच सध्या ज्युनिअर एनटीआरच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. जाणून घेऊ या ज्युनिअर एनटीआरच्या लग्नाची ही भन्नाट गोष्ट.
ज्युनिअर एनटीआर हा दाक्षिणात्य चित्रपट जगतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. एनटीआरच्या चित्रपटांची आणि दमदार अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते. या प्रसिद्ध अभिनेत्याची झलक पाहायला त्याचे चाहते अगदी वेडे होत असतात. त्याच्या चित्रपट आणि अभिनयाची जितकी चर्चा होत असते तितकीच त्याच्या शाही विवाह सोहळ्याचीही सर्वत्र चर्चा होताना दिसत असते. अभिनेता ज्युनिअर एनटीआरने २०१० मध्ये लक्ष्मी प्रणेतीसोबत विवाह केला होता. या लग्नाचे वैशिष्ट म्हणजे हा विवाहसोहळा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात महागडा लग्नसोहळा म्हणून ओळखला जातो.
समोर आलेल्या माहितीनुसार, ज्युनिअर एनटीआर आणि लक्ष्मी प्रणेती यांच्या लग्नात तब्बल १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.ज्यामध्ये फक्त मंडप सजवण्याचा खर्च १८ रुपये झाला होता. इतकेच नव्हेतर या शाही विवाह सोहळ्यात ३ हजार पाहुण्यांसोबतच चक्क बारा हजार चाहतेसुद्धा सहभागी झाले होते. या शाही विवाह सोहळ्याचे थेट प्रक्षेपण त्यांच्या राज्याच्या चॅनेलवरही दाखवले गेले होते.
रिपोर्ट्सनुसार, ज्युनियर एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रणतीने लग्नात 1 कोटी रुपयांची सोन्याची साडी नेसली होती. यासोबतच लाखोंचे दागिनेही घातले होते. जूनियर एनटीआर आणि लक्ष्मी प्रणती यांचा ५ मे २०११ रोजी विवाह झाला होता. साऊथ सुपरस्टार त्याची पत्नी लक्ष्मी पेक्षा वयाने 10 वर्षांनी मोठा आहे पण तरीही दोघांमध्ये सुंदर नाते आहे. आपल्या पत्नीबद्दल बोलताना एकदा ज्युनिअर एनटीआरने माझे लक्ष्मीसोबत लग्न झाले या मी माझे भाग्य समजतो असे मत व्यक्त केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा