Friday, March 29, 2024

ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्याची कमाल! चक्क आकाशात दाखवला कारनामा, व्हिडिओ पाहून व्हाल दंग

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरची (Jr.NTR) लोकप्रियता तर सगळ्यांना माहीतच आहे. त्याची एक झलक पाहायला त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. मात्र आता ज्युनिअर एनटीआरची प्रसिद्धी पाहून बॉलिवूड आणि जगभरातील लोक थक्क झाले आहेत. कारण आता या सुपरस्टारला मिळत असलेले अफाट प्रेम जग पाहत आहे. ज्युनिअर एनटीआरचा आगामी  ‘आरआरआर’ चित्रपट थिएटरमध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. त्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जॅक्सनविल, फ्लोरिडा आहे. येथील एका चाहत्याने असे काही केले आहे की, त्यावरून अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या अफाट लोकप्रियतेची प्रचिती येत आहे.

राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील ‘थोक्कुकुंटापोवाले’ हा एक लोकप्रिय संवाद आहे, ज्याचा हिंदी अनुवाद “आता समोरून वार होणार” असा आहे. हा डायलॉग ज्युनियर एनटीआरचा आहे. आता व्हायरल व्हिडिओमध्ये अमेरिकेतील एका चाहत्याने त्याचा हा डायलॉग चक्क विमानाच्या पाठीमागे लिहिला आहे. चाहत्यांनी दाखवलेला प्रकार म्हणजेच एनटीआर ज्युनियरचे चाहते त्याचे नाव आकाशाच्या उंचीवर नेण्यात कुठलीही कसर सोडणार नाहीत याचा पुरावा आहे.

‘आरआरआर’ चित्रपट लवकरच अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्युनियर एनटीआर या चित्रपटात कोमाराम भीमची भूमिका साकारत आहेत. जे स्‍वातंत्र्यसैनिक होते. चाहते आता हे आता या चित्रपटाची जोरदार प्रतीक्षा करत आहेत.

‘आरआरआर’ हा चित्रपट २५ मार्च २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त राम चरण, आलिया भट्ट, नयनतारा आणि अजय देवगण देखील दिसणार आहेत. राजामौली यांनी हा चित्रपट त्यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटाप्रमाणे मोठ्या बजेटमध्ये बनवला आहे. या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट आणि अजय देवगण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.

हेही वाचा –

हे देखील वाचा