Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड जुबिन नौटियाल आणि निकिता दत्ता लवकरच चढणार बोहल्यावर? गायकाने मुंबईला येऊन केला लग्नाचा प्लॅन फिक्स

जुबिन नौटियाल आणि निकिता दत्ता लवकरच चढणार बोहल्यावर? गायकाने मुंबईला येऊन केला लग्नाचा प्लॅन फिक्स

जुबिन नौटियाल आणि कबीर सिंग फेम निकिता दत्ता यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. त्यांची फॅमिली देखील एकमेकांना भेटली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार नुकतेच निकिता उत्तराखंडमधील जुबिनच्या होमटाऊनमध्ये गेली होती. तसेच तो देखील लग्नाच्या प्लॅनिंगसाठी मुंबईला आला होता. जुबिन आणि निकिता याआधी देखील अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत. दोघेही अनेकवेळा डिनरसाठी स्पॉट झाले आहेत.

जुबिन आणि निकिताने अजून त्यांचे नाते अधिकृत केले नाही. परंतु दोघेही अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना ते रिलेशनमध्ये असावे असा संशय आधीच आला होता. सगळेजण विचारत होते की, नक्की काय चाललं आहे. (Jubin nautiyal and Nikita dutta wedding details, couple may marry soon)

निकिताला विमान तळावर तिच्या कथित बॉयफ्रेंडला पीकअप करताना देखील पाहिले गेले आहे. नंतर मग तिने सोशल मीडियावर पोस्ट करून सगळ्यांना ते रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले. निकिताची ही पोस्ट उत्तराखंडमधील होती. जुबिन तिथेच राहतो. दोघेही अनेकवेळा सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. त्यामुळे आता ते लवकरच लग्न करतील असे त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे.

जुबिन आणि निकिताची पहिली भेट शाहिद कपूर आणि कियार आडवाणी यांच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात निकिताने शरदच्या गर्लफ्रेंडचे पात्र निभावले होते तर जुबिनने ‘तुझे कितना चाहे और हम’ हे गाणे गायले होते.

टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन चालू आहे. अशातच आता जर जुबिन आणि निकिताचे लग्न झाले तर चाहते खूपच खुश होतील. त्या दोघांची जोडी देखील अनेकांना आवडते. तसेच त्यांच्यातील केमेस्ट्री देखील खूप छान आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा