Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड एव्हरग्रीन ब्यूटी! वयाच्या ५३ व्या वर्षी देखील इतकी सुंदर दिसते जुही चावला, पाहा फोटो

एव्हरग्रीन ब्यूटी! वयाच्या ५३ व्या वर्षी देखील इतकी सुंदर दिसते जुही चावला, पाहा फोटो

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. जुही चावलाने आजवर सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने आणि सुंदरतेने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली आहेत. नव्वदच्या दशकामधील ही अभिनेत्री लवकरच ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये झळकणार आहे. सध्या ती चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली, तरी तिची सुंदरता आजही अबाधित आहे. आजही तिच्या सुंदरतेने ती चाहत्यांना वेड लावते. गेली ३५ वर्षे ती सिनेसृष्टीमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काळानुसार तिने तिच्या लुकमध्ये देखील बदल केला आहे. 

साल १९८६ मध्ये जुही चावलाने ‘सल्तनत’ या चित्रपटामधून अभिनयाला सुरुवात केली. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्यानंतर तिने कन्नड चित्रपटांकडे धाव घेतली आणि ‘प्रेमलोक’ या चित्रपटामध्ये दमदार अभिनय केला. त्यानंतर पुन्हा साल १९८८ मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले आणि ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटांमधून घराघरात पोहोचली. या चित्रपटामधून तिने भरपूर यश संपादन केले. तसेच या चित्रपटासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. आजही चाहते तिचा हा चित्रपट आवर्जून पाहतात.

यानंतर जुहीने ‘प्रतिबंध’, ‘स्वर्ग’, ‘बोल राधा बोल’, ‘राजू बन गया जेंटलमॅन’, ‘आईना’, ‘हम है राही प्यार के’, ‘साजन का घर’, ‘राम जाने’, ‘लोफर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच तिच्या अभिनयाने आणि सुंदरतेने तिने लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

जुहीचा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे. अभिनयासहित ती रॅम्प वॉक करताना देखील दिसली आहे. वेब सिरीजमध्ये देखील तिने स्वतःचे नशीब आजमावले आहे. साल २०१७मध्ये ती ‘द टेस्ट केस’ या वेब सिरीजमध्ये झळकली होती.

 

जुही सध्या ५३ वर्षांची आहे. परंतु आजही तिच्या सुंदरतेने ती बॉलिवूडमधील सध्याच्या सुंदर अभिनेत्रींना मागे टाकते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुख खान नव्हे, तर ‘हा’ अभिनेता होता यश चोप्राची पहिली पसंत; ‘डर’ चित्रपटाविषयी जुही चावलाचा मोठा खुलासा

-…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

जुही चावला झोपून गेल्यानंतर, तिच्या घरी पार्टीसाठी पोहचला शाहरुख खान; मग पुढे जे झाले…

हे देखील वाचा