Wednesday, December 4, 2024
Home बॉलीवूड कोण आहे जुही चावलाची मुलगी? आयपीएलच्या लिलावात आर्यन आणि सुहाना खानसोबत फोटो व्हायरल

कोण आहे जुही चावलाची मुलगी? आयपीएलच्या लिलावात आर्यन आणि सुहाना खानसोबत फोटो व्हायरल

आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. यामध्ये क्रिकेट क्षेत्रातील खेळाडूंसह अनेक दिग्गज कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती. पहिल्या दिवशीच्या लिलाव प्रक्रियेत अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यनसुद्धा (Aryan Khan) दिसला होता. त्याचबरोबर पहिल्यांदाच अभिनेत्री जुही चावलाची (Juhi Chawla) मुलगी जान्हवी मेहतासुद्धा उपस्थित होती. पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आलेल्या जान्हवीबद्दल जाणून घेऊया.

आयपीएलचा पहिल्या दिवशीचा लिलाव बँगलोरमधील हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी कोलकाता टीमचा मालक असलेल्या शाहरूख खानची दोन्ही मुले आर्यन खान आणि सुहाना खान (Suhana Khan) दोघांनीही हजेरी लावली होती. मात्र त्या दोघांपेक्षा सर्वांचे लक्ष वेधले, ते अभिनेत्री जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहताने. आर्यन खान आणि सुहाना खान अनेकदा कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. मात्र जान्हवी मेहता पहिल्यांदाच दिसली, त्यामुळे या फोटोची चांगलीच चर्चा रंगली.

अभिनेत्री जुही चावला आणि शाहरुख खान यांची मैत्री जगजाहीर आहे. दोघांनी अनेक चित्रपटात काम केले असून त्यांच्यातील घट्ट मैत्री आजही कायम आहे. त्यांच्या प्रमाणेच शाहरुख आणि जुहीच्या मुलांमध्येसुद्धा मैत्री आहे. या आधीही मागच्या आयपीएल स्पर्धेत जान्हवी मैदानात दिसली होती.

हेही पाहा- अभिनेता शाहिद कपूरला आहेत ३ आई आणि ३ बाप । Shahid Kapoor Has 3 Mothers And 3 Fathers

अभिनेत्री जुही चावलाने १९९५ मध्ये उद्योजक जय मेहता सोबत लग्न केले. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. दोन्ही मुले माध्यमांपासून नेहमीच लांब असतात. मात्र आता अनेकदा ते कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जान्हवी मेहताने परदेशात आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिच्या लंडनमधील पदवी वितरण समारंभाचे फोटो जुहीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. आपल्या आईप्रमाणे जान्हवीला अभिनयात रस नाही. तिला पुस्तके वाचन्याचा छंद असून लेखक बनण्याचे तिचे स्वप्न आहे.

हेही वाचा-

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा