Wednesday, July 3, 2024

5जी प्रकरण: जुही चावलाने हायकोर्टातून मागे घेतली याचिका, कोर्टाने ठोठावला होता २० लाखांचा दंड

 

जुही मागील बऱ्याच काळापासून 5जी नेटवर्क लागू करण्याच्या विरोधात उभी राहून, तिची याबाबतची भूमिका मांडत आली होती. २९ जुलै रोजी तिच्या या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनवाई करण्यात आली. जुहीचे म्हणणे होते की, या केसमध्ये ‘खारीज’ शब्द काढून तिथे ‘अस्वीकार्य’ शब्द टाकण्यात यावा. कोर्टात जुही चावलाच्या वकील असलेल्या दीपक खोसला यांच्याकडून एक वक्तव्या जाहीर केल्यानंतर, जस्टीस जयंत नाथ यांनी याचिका पुन्हा घेण्याची परवानगी दिली. (Juhi Chawla Withdraws Her Petition)

दाखल केलेल्या याचिकेमध्ये सांगितले होते की, 5जी वायरलेस तंत्रज्ञानामुळे मनुष्यावर गंभीर, अपरिवर्तनीय प्रभाव आणि पृथ्वीच्या सर्व इकोसिस्टमला कायमस्वरूपी नुकसान पोहचण्याचा धोका आहे. जर दूरसंचार विभागाच्या 5 जी संदर्भातील सर्व योजना पूर्ण झाल्या, तर पृथ्वीवर व्यक्ती, जनावर, पक्षी, कीटक, झाडं हे सर्व या 5 जीच्या होणाऱ्या प्रतिकूल प्रभावामुळे प्रभावित होतील.

जुही चावलाने या प्रकरणात ३१ मेला दिल्ली हाय कोर्टात धाव घेत 5 जीमुळे होणाऱ्या रेडिएशनमुळे माणसांपासून ते जनावर, झाडं, पक्षी आदी सर्व सजीव लोकांवर याचा मोठ्याप्रमाणावर दुष्परिणाम होईल, या संदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने जुहीची ही याचिका फेटाळून लावली आणि कायद्याचा दुरुपयोग केल्यामुळे तिच्यावर २० लाखांचा दंड ठोठावला. कोर्टाने जुहीच्या केसवर ‘दोषपूर्ण’ करार देत सांगितले की, तिने मीडियामध्ये स्वतःचा प्रचार करण्यासाठी ही केस दाखल केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा