Wednesday, August 6, 2025
Home कॅलेंडर मेरा झुमका गिरा रे…! जुहीची किमती चीज हरवली, शोधणाऱ्याला देणार खास इनाम

मेरा झुमका गिरा रे…! जुहीची किमती चीज हरवली, शोधणाऱ्याला देणार खास इनाम

नव्वदीच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला ही सध्या चित्रपट सृष्टीत तशी फारशी कार्यरत नाही. तरीही ती चर्चेत मात्र असते. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाची ती सहमालकीण आहे. आणि स्टेडियममध्ये आपल्याला ती केकेआर संघाला चिअर अप करताना दिसत असते.

परंतू, सध्या ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे, जुही चावला हिच्या कानातले म्हणे एअरपोर्टवर कुठे तरी पडलं आहे. आणि याबाबत तसं तिने स्वतःच ट्विटरवरून सांगितलं आहे. तसेच कानातल्या झुमक्याचा फोटो देखील जोडला आहे. जो व्यक्ती तिला हा तिचा आवडता झुमका शोधून देईल, त्याला जुही बक्षीस देखील देणार आहे.

नेमकं काय घडलंय….

जुही चावला ही मुंबई विमानतळावरून कुठे तरी प्रवासाला जात होती. चेक इन सुद्धा झालं आणि मॅडमचा कानातील झुमका हा कुठेतरी पडला. बरं हा झुमका सोन्याचा वगैरे नव्हता तर चांगलाच हिरेजडित होता आणि जुही गेल्या पंधरा वर्षांपासून तो झुमका परिधान करत आली आहे. आता यावरून तरी आपल्याला कळालंच असेल की, जुहीसाठी हा झुमका किती खास असेल. सोशल मीडियावर सध्या हा झुमका जबरदस्त व्हायरल होत आहे.

जुहीने ट्विटवरून ही माहिती देत पोस्ट मध्ये तिने म्हटलं आहे की,“सकाळी (रविवारी) मी मुंबई विमानतळाच्या गेट नंबर ८ वर जात होते. मी एमायरेट्स काउंटरवर चेक इन केले, मला सुरक्षा तपासणी मिळाली, पण कोठेतरी माझा हिरेजडित झुमका पडला आहे. जर कोणी मला मदत करू शकेल तर मी त्याची आभारी राहीन. झुमका सापडल्यास आपण पोलिसांना कळवा, त्याबदल्यात मी आपल्याला बक्षीस देते. हा झुमका माझा मॅचिंग झुमका आहे, जो मी गेल्या १५ वर्षांपासून सतत परिधान केला आहे, कृपया मला तो शोधण्यात मदत करा.”

काय मग आपण जर विमानतळावर असाल आणि आपल्यास हा झुमका आढळला तर कराल ना झुहीची मदत.!

हे देखील वाचा