Wednesday, January 28, 2026
Home कॅलेंडर एनटी रामारावांच्या १००व्या जयंतीनिमित्त नातवाने काढली आठवण, तर अनेकांनी वाहिली आदरांजली

एनटी रामारावांच्या १००व्या जयंतीनिमित्त नातवाने काढली आठवण, तर अनेकांनी वाहिली आदरांजली

दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते एनटी रामाराव (NT Ramarao), ज्यांना एनटीआर म्हणूनही ओळखले जाते, त्यांची आज जयंती आहे. अभिनेता असण्याव्यतिरिक्त एनटीआर एक दिग्दर्शक, निर्माता, स्टुडिओ प्रमुख, राजकारणी आणि मुख्यमंत्री देखील होते. २८ मे १९२३ रोजी जन्मलेल्या नंदामुरी तारका रामाराव यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे चाहते आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

अशा परिस्थितीत जयंतीनिमित्त, एनटी रामाराव यांचा नातू आणि दक्षिण उद्योगातील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर (JR NTR) यानेही त्यांची आठवण काढली. यावेळी अभिनेत्याचे स्मरण करत सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरने ट्विटरवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “तुमची नेहमी आठवण येते.” (junior ntr remembers nt rama rao on his 100th birth anniversary)

त्याच वेळी, दक्षिण इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता अनिल रविपुडी यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “आमचे महान एनटीआर गुरू, तेलुगू चित्रपटसृष्टीचा अभिमान, त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण.” अभिनेत्याची आठवण करून चित्रपट निर्माते हरीश शंकर यांनी लिहिले, “एनटीआरसारखे याआधी कोणी नव्हते, कधी होणारही नाही.”

याशिवाय दिग्दर्शक श्रीनू वैटलाने लिहिले, “एक अभिनेता म्हणून मनोरंजक, एक नेता म्हणून विकास आणि एक व्यक्ती म्हणून स्वाभिमान. तेलुगू लोकांच्या हृदयात तुमचे स्थान कायम राहील.” यासोबतच देशाचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, अभिनेते चिरंजीवी आणि इतरांनीही ट्वीट करून दिवंगत अभिनेते एनटी रामाराव यांना श्रद्धांजली वाहिली.

अभिनेते एनटीआर यांनी त्यांच्या दीर्घ अभिनय कारकिर्दीत एकूण ३०० चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आणि चित्रपट निर्माता म्हणूनही अनेक चित्रपट केले. एनटी रामाराव हे लोकप्रिय अभिनेते असण्यासोबतच एक यशस्वी राजकीय व्यक्तिमत्व देखील होते. ते १९८३ मध्ये पहिल्यांदा, १९८५ मध्ये दुसऱ्यांदा आणि १९९४ मध्ये तिसऱ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा