Saturday, June 29, 2024

दुःखद! लोकप्रिय गायिकेची आत्महत्या, हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

काही दिवसांपूर्वीच कोरियन संगीत विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली होती. के-पॉप स्टार गायक मूनबिनने आत्महत्या केल्याची. अजून या बातमीला थोडा काळ होत नाही तोवर आता अजून एका के-पॉप स्टारने आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. के-पॉप स्टार आणि प्रसिद्ध कोरियन गायिका हासूने आत्महत्या केली आहे. तिच्या या आत्महत्येमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. कोरियन बातम्यांनुसार हासूचा मृतदेह एका हॉटेलमध्ये संशयास्पद पद्धतीने सापडला आहे. हासू केवळ २९ वर्षाची होती. तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण जगातील तिच्या फॅन्समध्ये शोक पसरला आहे.

हासू खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायिका होती. तिने २०१९ साली आलेल्या ‘मे लाइफ मी’ या अल्बममधून या क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर तिची असंख्य गाणी प्रदर्शित झाली, जी कमालीची गाजली. सांगण्यात येणाऱ्या माहितीनुसार हासू २० मे रोजी वंजू गन, जिओलाबुक-डो मध्ये ग्वांजुम्योन पीपुल्स डे इव्हेंटमध्ये परफॉर्म करणार होती. मात्र त्या आधीच या इव्हेंट आयोजकांना तिच्या निधनाची बातमी मिळाली आहे.

हासू राहत असलेल्या हॉटेलमध्ये पोलिसांना सुसाईड होत मिळाल्यामुळे प्रथमदर्शी त्यांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले आहे. मात्र यावर आता तपास सुरु झाला आहे. हासूच्या आत्महत्येनंतर तिचे फॅन्स आता सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे” सीबीआयच्या छापेमारीनंतर समीर वानखेडे यांनी व्यक्त केली भावना

“जरा सेटपर्यंत सोडतो का?” अमिताभ बच्चन यांनी चक्क रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट

हे देखील वाचा