Monday, June 17, 2024

“मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे” सीबीआयच्या छापेमारीनंतर समीर वानखेडे यांनी व्यक्त केली भावना

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थांच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर समीर वानखेडे हे नाव अमाप गाजले. त्यांना संपूर्ण देशाने जिगबाज म्हणत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यूनंतर समीर हे कमालीचे चर्चेत आले होते. मात्र आता त्यांच्यावर २५ कोटींची लाच घेतल्याचा मोठा आणि अतिशय गंभीर आरोप लावला गेला आहे. या आरोपामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांच्या घरावर आणि इतर मालमत्तेवर सीबीआयने धाडी देखील मारल्या होत्या. या सर्व प्रकरणावर आता समीर वानखेडे यांनी मौन सोडले आहे.

समीर वानखेडे यांनी एका मोठ्या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सीबीआयने माझ्या घरी छापा टाकून जवळपास बारा तासांपेक्षा जास्त काळ झडती घेतली. या झडतीमध्ये त्यांना माझ्या घरातून १८ हजार रुपये रोख रक्कम आणि माझ्या काही मालमत्तेची ४ कागदपत्रे सापडली आहे. मात्र ती मालमत्ता मी या सेवेत येण्याआधी विकत घेतली होती. ही मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे. सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने माझ्या वडिलांच्या अंधेरी येथील घरावर छापा टाकला. मात्र त्यांना काहीच मिळाले नाही. सीबीआयच्या सात अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या पथकाने माझ्या सासरच्या घरीही छापा मारला. माझे सासू-सासरे दोघेही वयस्कर आहेत,”

मुंबईतील एका क्रूझवर २०२१ साली समीर वानखेडे यांनी त्यांच्या टीमने छापेमारी केली होती. तेव्हा त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक मोठ्या घरातील मुलांना आणि इतर लोकांना अटक केली. आर्यन खानची सुटका करण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून सीबीआयने समीर वानखेडे यांच्याशी संबंधित सुमारे २९ ठिकाणांवर छापेमारी केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव

केवळ बॉलिवूडच नाही तर टॉलिवूडमध्ये देखील ‘या’ मराठी कलाकारांनी पाडलीये छाप

हे देखील वाचा