बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी हे आता ७५ वर्षांचे झाले आहेत. १६ जानेवार, १९४६ रोजी लाहौर येथे कबीर बेदी यांचं जन्म झाला. कबीर बेदी हे नात्यामध्ये अभिनेता आफताब शिवदासानीचे साडू लागतात. आपण म्हणाल कसं काय? तर सांगतो, सगळं सांगतो. झालं असं की, कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांज आणि आफताबची पत्नी निन दोसांज या दोघी सख्ख्या बहिणी आहेत.
परवीन दोघींमध्ये मोठी आहे तर निन लहान आहे. कबीर बेदी यांनी २०१६ मध्ये आपल्या ७० व्या वाढदिवसाच्या ठीक एक दिवस अगोदर स्वतःपेक्षा ३० वर्ष लहान असलेल्या प्रेयसी परवीन दोसांजसोबत चौथं लग्न केलं.
परवीन दोसांज आता ४५ वर्षांची आहे. गंमतीचा भाग म्हणजे कबीर बेदी यांची कन्या पूजा बेदीपेक्षाही परवीन ५ वर्षे लहान आहे. ब्रिटीश वंशाची अभिनेत्री आणि मॉडेल परवीन दोसांझ लग्नाच्या आधी दहा वर्षे कबीर बेदी यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिली आहे.

कबीर बेदी यांचं पहीलं लग्न नृत्यांगना प्रतिमा बेदी यांच्याशी १९६९ मध्ये झालं होतं. प्रतिमा – कबीर याना दोन मुलं झाली. मुलगी पूजा आणि मुलगा सिद्धार्थ! दोघेही जवळपास पाच वर्षे एकत्र राहिले आणि यानंतर १९७४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
कालांतराने सिद्धार्थने आत्महत्या केली. यातून कबीर आणि प्रतिमा दोघांनाही मुलाच्या मृत्यूचा जबर धक्का बसला. यानंतर प्रतिमा यांचा देखील एका कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रतिमासोबत घटस्फोट घेतल्यानंतर कबीर बेदी आणि परवीन बाबी यांच्यात एक नातं उमलू लागलं होतं. कबीर यांच्यासोबत परवीन बाबी यांनी हॉलिवूडपर्यंतच प्रवास केला. परंतु यांचं सतत कामात व्यस्त राहण्यामुळे आपल्याला दुर्लक्षित केलं जातं असल्याची भावना परवीन बाबी यांच्यात निर्माण झाली. यासाठी काही वेळानंतर परवीन बाबी यांनी सुद्धा कबीर बेदी यांच्यासोबतचे सर्व संबंध संपुष्टात आणले.
परवीन बाबीशी ब्रेकअप झाल्यानंतर कबीर बेदी यांनी ब्रिटिश फॅशन डीझाईनर सुसैन हम्फ्रेस सोबत दुसऱ्यांदा विवाह केला. सुसैन आणि कबीर यांना एक मुलगा सुद्धा आहे, ज्याचं नाव एडम बेदी आहे. एडम इंटरनेशनल मॉडल आहे. कालांतराने कबीर बेदी आणि सुसैन हम्फ्रेस सुद्धा एकमेकांपासून वेगळे झाले.
यानंतर कबीर बेदी यांनी १९९२ मध्ये में टीवी और रेडियो प्रेजेंटर निक्की सोबत तिसऱ्यांदा लग्न केलं. जवळपास १३ वर्षांनंतर २००५ मध्ये हे लग्न हटस्फोट होऊन मोडलं. दोघांनाही अपत्य नव्हतं. यानंतरच कबीर ब्रिटिश वंशाची अभिनेत्री परवीन दोसांज हिच्यासोबत रिलेशनमध्ये आले.

कबीर बेदी यांची परवीन सोबत पहिली भेट लंडनमध्ये एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. २००५ मध्ये कबीर एका नाटकात काम करत होते. आणि त्या नाटकाचा प्रयोग सेंट्रल लंडनच्या शेफ्ट्सबरी थिएटरमध्ये होता. परवीन मित्रांसोबत नाटक पाहण्यासाठी पोहोचली. नाटक संपल्यानंतर सर्वांनी कबीर यांची भेट घेतली आणि बोलता बोलता परवीन कबीर बेदी यांच्याकडे आकर्षित झाली.
परवीन दोसांज ने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिचा जन्म जरी इंग्लंड मध्ये झाला असला तरीदेखील ती पंजाबी शीख कुटुंबातील मुलगी आहे. तिने हे सुद्धा सांगितलं आहे की कबीर तिला प्रेमाने ‘पंजाबी शेरनी’ म्हणून हाक मारतात.
कबीर आणि परवीन यांचं लग्न १५ जानेवारी, २०१६ ला झालं होती. दोघेही १० वर्षांपूर्वी नात्यात आले होते. त्यांना वेळ अगदी जलद गतीने जात चालला आहे हे जाणवलं. त्यामुळे सावधानता बाळगत तिने एग्ज फ्रीज केले होते.

कबीर यांची कन्या पूजा बेदीचं सावत्र आई परवीन दोसांज सोबत अजिबात पटत नाही. एकदा तर पूजा ने परवीन साठी ‘चेटकीण’ शब्दाचा प्रयोग केला. कबीर आणि परवीन यांच्या लग्नानंतर पूजा ने ट्वीट केलं होतं – प्रत्येक आनंदी कथेत ही एक चेटकीणच असते आणि माझ्या मते ती माझ्या आयुष्यात आज आलीये.”