Monday, February 2, 2026
Home अन्य रस्ता अपघातात कच्चा बदाम फेम भुबन बड्याकर जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

रस्ता अपघातात कच्चा बदाम फेम भुबन बड्याकर जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

‘कच्चा बदाम’ हे गाणे गाऊन एका रात्रीत स्टार झालेला भुबन बड्याकरचा (Bhuban Badyakar) २८ फेब्रुवारी रोजी मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर त्याला पश्चिम बंगालच्या बीरभूम येथे असलेल्या सरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार भुबनचा हा अपघात तेव्हा झाला, जेव्हा तो त्याची नुक्तीचं नवीन खरेदी केलेली सेकंडहॅन्ड गाडी चालवायला शिकत होता. या अपघातामध्ये त्याला छातीला मार बसला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रस्त्यावर ‘कच्चा बदाम’ गाणे गाणारा भुबन बड्याकर या गाण्यामुळे एका रात्रीत सोशल मीडिया सेन्सेशन बनला. त्याचे हे गाणे इतके व्हायरल झाले की, प्रत्येक नेटकाऱ्याने या गाण्यावर त्यांचे त्यांचे रील बनवले होते. भुबन बीरभूम जिल्ह्यातील प्रत्येक गावात जात कच्चा बदाम हे गाणे गात शेंगदाणे विकण्याचे काम करायचा.

पुढे या गाण्याला रिमिक्स करून यूटुबवर अपलोड केले गेले. या गाण्याला यूटुबवर ५० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. मग हे गाणे हौहाळू सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि इंटरनेट सेन्सेशन झाले. भुबन हा मूळचा पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातल्या लक्ष्मीनारायणपुर पंचायतमध्ये येणाऱ्या कुरलजुरी येथील दुबराजपुर गावातला राहणार आहे. भुबनच्या पाच सदस्यीय घरात त्याची पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी सामील आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी तो लोकांच्या घरातील तितक्या फुटक्या सामानाच्या बदल्यात शेंगदाणे विकायचा. हे शेंगदाणे विकण्यासाठी तो लांब लांबच्या गावात सायकलवर फिरायचा. दररोज तो तब्बल ३/४ किलो शेंगदाणे विकून २०० ते २५० रुपयांची कमाई करायचा. आता जेव्हा त्याला कच्चा बदाम गाण्यामुळे एवढे यश मिळाले आहे, ते पाहून त्याने शेंगदाणे विकण्याचा त्याचा निर्णय बदलण्याचे ठरवले आहे.

नुकताच भुबन बड्याकरला पश्चिम बंगालच्या पोलिसांनी देखील सन्मानित केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका म्युझिक कंपनीने त्याला तीन लाख रुपयांचा चेक देत त्याच्यासोबत एक नवीन करार केला आहे. त्याची वाढणारी लोकप्रियता पाहून अनेक शोमध्ये त्याला काम करण्याची संधी देखील मिळत आहे.

हेही वाचा  –

हे देखील वाचा