Friday, March 29, 2024

अनन्या पांडे लवकरच बनणार मिसेस खट्टर? ‘त्या’ व्हिडिओने अफेअरच्या चर्चेला दिली हवा!

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. तिचा ‘गहराइयां’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. तेव्हापासुन अनेकदा अनन्या कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या व्यावसायिक आयुष्यापासुन खासगी आयुष्याची अनेकदा चर्चा होताना दिसत असते. आता अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ती अभिनेता ईशान खट्टर( Ishaan Khattar) सोबत दिसल्याने दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

अनन्या पांडे ही हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या अनन्या आणि ईशान खट्टरच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. दोघांना अनेकदा एकत्र फिरताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. याबाबत दोघांनीही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. मात्र दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बर्‍याच दिवसांपासुन सुरू आहे. आता दोघेही पुन्हा एकदा शाहीद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एकत्र दिसले आहेत.

अभिनेता शाहिद कपूरने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ईशान आणि अनन्या एकमेकांच्यात हरवल्याचे दिसून येत आहे. दोघांनी हातात हात घालून फोटो काढले आहेत. अनेक फोटोत सगळ्यांच्या नजरा याच दोघांवर असल्याचे दिसत आहे. दोघांचाही ‘खाली पिली’ चित्रपट चांगलाच गाजला होता. याच चित्रपटानंतर त्यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती. दोघे काही दिवसांपूर्वी फिरायलासुद्धा गेले होते. दरम्यान अभिनेत्री अनन्या पांडेचा ‘गेहराइयां’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘हा’ दिग्गज आहे अनन्या पांडेचा गुरू, म्हणाली ‘माझा प्रत्येक चित्रपट…’
बापरे! अनन्या पांडेने लग्नाबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘मी तीन तीन…’

हे देखील वाचा