×

Mother’s Day 2022 | खासदिनी काजल अग्रवालवर लावला गेला ‘हा’ आरोप, तक्रार दाखल होताच अभिनेत्रीने…

मदर्स डेच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, अभिनेत्री काजल अग्रवालला (Kajal Aggarwal) टीकेला सामोरे जावे लागले. खरं तर एक इन्स्टाग्राम युजर आणि कवयित्री साराने तिच्या आईसाठी लिहिलेली कविता आणि कॅप्शन काजलने कॉपी केल्याचा आरोप केला होता. साराने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्रीविरोधात कॉपीराइट उल्लंघनाची तक्रारही दाखल केली होती. दरम्यान, अभिनेत्रीने नंतर तिची पोस्ट एडिट केली आणि कवितेच्या कवयित्रीला श्रेय दिले.

View this post on Instagram

A post shared by Kajal A Kitchlu (@kajalaggarwalofficial)

खरं तर, मदर्स डेच्या निमित्ताने, अभिनेत्रीने तिचा मुलगा नीलची चांगली काळजी घेतल्याबद्दल, तिची आई सुमन अग्रवालसाठी एक पोस्ट शेअर केली होती. ही कविता सारा नावाच्या लेखिकेची होती. याशिवाय तिने साराला श्रेयदेखील दिले नव्हते. अभिनेत्रीच्या पोस्टवर आक्षेप घेत, साराने पोस्टचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले की, “काजल अग्रवालने माय डिअर मम कविताची मूळ कॉपी शेअर केली आहे. यासोबत माझे स्वतःचे कॅप्शन काही शब्द बदलून शेअर केले आहे. कोणाला वेळ असेल तर मला श्रेय द्यायला सांगा. आशा आहे की हा फक्त एक गैरसमज असेल.” (kajal aggarwal called out for copying poem on mothers day writer files copyright infringement complaint)

जेव्हा साराची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली, तेव्हा काजल अग्रवालने तिची पोस्ट एडिट केली आणि कवितेचे श्रेयही साराला दिले. मात्र, काजलने तिच्या पोस्टवरील कमेंट ऑफ केल्या आहेत. यानंतर सारानेही तिचे श्रेय मिळवून देण्यासाठी तिला पाठिंबा देणाऱ्या लोकांचे आभार मानले. 

View this post on Instagram

A post shared by Kajal A Kitchlu (@kajalaggarwalofficial)

काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांचे ३० ऑक्टोबर २०२० रोजी लग्न झाले आणि यावर्षी १९ एप्रिलला त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. त्याचवेळी, मदर्स डेच्या निमित्ताने काजल अग्रवालने तिचा मुलगा नील किचलूची पहिली झलकही तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली.

Latest Post