Saturday, June 29, 2024

काजोल आणि न्यासा देवगन बनल्या ट्रोलिंगच्या शिकार, माय-लेकीसाठी का येतायेत अशा कमेंट्स?

अजय देवगण (Ajay Devgan) आणि काजोलची (Kajol) मुलगी न्यासा देवगनच्या (Nysa Devgan) बॉलिवूड पदार्पणाबाबत चाहते अनेक दिवसांपासून प्रश्न विचारत आहेत. मात्र न्यासा सतत तिच्या रंगासाठी सोशल मीडियावर ट्रोल होत असते. अलीकडेच काजोल आणि न्यासा या दोघींना त्यांच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. खरं तर नुकतीच काजोल पिलाटे क्लासच्या बाहेर दिसली.

फॅट शेमिंगचा शिकार झाली काजोल
काजोलने पॅपाराझींसाठी पोझ दिल्या. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी तिला फॅट शेमिंगचा शिकार बनवले. एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, “हा अस्वल कुठून आला?” दुसर्‍या युजरने लिहिले, “हे लोक चित्रपटात इतके फिट दिसतात आणि वास्तविक जीवनातही असे दिसतात.” दुसर्‍या व्यक्तीने कमेंट केली, “काजोल काय आहे, तुझे वजन का वाढत आहे.” (kajol devgn and nysa devgn trolled on same day for different reasons)

सावळ्या रंगामुळे न्यासा झाली ट्रोल
त्याच दिवशी काजोलची मुलगी न्यासा देवगनलाही सोशल मीडिया युजर्सनी ट्रोल केले होते. काजोलला तिच्या शरीरयष्टीसाठी ट्रोल करण्यात आलं होतं, तर न्यासाला नेहमीप्रमाणे तिच्या रंग आणि शरीरासाठी ट्रोल करण्यात आलं. न्यासाच्या फोटोंवर एका युजरने लिहिले की, “तोंडात विमल आहे, यामुळे मास्क घातलाय का?” एका व्यक्तीने लिहिले, “तिने रंगावर खूप खर्च केला आहे.”

चाहते पाहतायेत न्यासाच्या पदार्पणाची वाट
एकीकडे अजय देवगण आणि काजोल हळूहळू पडद्यामागे काम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. तर दुसरीकडे, चाहते अजय-काजोलची मुलगी न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल खूप उत्सुक आहेत. मात्र, ती दरदिवशी ट्रोल होत असते. अशा परिस्थितीत, तिच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा