Saturday, June 15, 2024

अतिशय आलिशान जीवन जगते अभिनेत्री काजोल, कोट्यवधींच्या गाड्या, लाखोंच्या साड्यांचे आहे चांगले कलेक्शन

कलाकारांच्या आलिशान जीवनाची भुरळ कोणाला पडली नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. नेहमीच कलाकार आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य लोकांच्या चर्चेचा विषय असतो. कलाकारांचे भव्य सर्व सुखसोयींनी युक्त असे घर, नेहमीच होणाऱ्या परदेश वाऱ्या, आलिशान गाड्या, भारीभारी कपडे आदी सर्वच गोष्टींना सामान्य माणूस नेहमीच भुलत असतो. बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री असलेल्या काजोलने देखील तिच्या प्रतिभेच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये तिचे मोठे प्रस्थ निर्माण केले. एकापेक्षा एक हिट सिनेमे देणाऱ्या काजोलने(kajol) अभिनेता अजय देवगणसोबत(ajay devgan)  लग्न केले आज काजोल चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिची लोकप्रियता आणि फॅन फॉलोविंग चांगलीच मोठी आहे. आज या लेखातून आपण काजोलच्या आलिशान जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत.

अजय देवगण आणि काजोल या जोडीला न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेत. काजोल जेवढी तिच्या व्यासायिक आयुशमुळे गाजते तेवढीच ती वैयक्तिक आयुष्यामुळे देखील लाइमलाईट्मधे येत असते. एका मुलाखतीदरम्यान अजयने खुलासा केला होता की, काजोलला ऑनलाईन शॉपिंग करणे खूपच आवडते. ती नेहमीच 600 ते 1200 रुपयांपर्यंत ऑनलाईन शॉपिंग करते. काजोलकडे असलेल्या महागड्या वस्तूंमध्ये शिवन आणि नरेश यांची डिझाइन केलेली कोको साडी आहे जिची किंमत 69हजार 950 रुपये आहे. मीडियामधील रिपोर्ट्सनुसार काजोलकडे लंडनच्या पार्क लेनमध्ये एक 54 कोटींचा बंगला आहे. इथेच शाहरुख खानचा देखील बंगला आहे.

याशिवाय अजय आणि काजोलकडे मुंबईमधील जुहू भागात स्वतःचा ‘शिवशक्ती’ नावाचा मोठा बंगला आहे. या घराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या घराची किंमत तब्ब्ल 60 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे बीएमडब्ल्यू, वॉल्वो आणि ऑडी अशा आलिशान गाड्या आहेत. त्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

अधिक वाचा- 
एकेकाळी ‘या’ हिट चित्रपटांना काजोलने दिला होता नकार, आज नक्कीच होत असेल पश्चाताप
कोण आहे महिमा मकवाना? जिला मिळाला सलमान खानच्या ‘अंतिम’ चित्रपटातून ब्रेक

हे देखील वाचा