Saturday, May 10, 2025
Home बॉलीवूड अत्यंत टाईट ड्रेस घातल्याने काजोल झाली ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘मुलीचा ड्रेस घातला वाटतं’

अत्यंत टाईट ड्रेस घातल्याने काजोल झाली ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘मुलीचा ड्रेस घातला वाटतं’

बॉलिवूड अभिनेत्री काजोल (kajol) सध्या तिच्या आगामी ‘दो पत्ती’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच काजोल ओटीटी अवॉर्ड शोमध्ये पोहोचली होती, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर येताच अभिनेत्रीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

काजोल या कार्यक्रमात काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. व्हिडिओ पाहिल्यानंतर ती या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकांच्याही ही बाब लक्षात आली आणि आता ते या अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल करत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘तिचे पोट गेले आहे.’ तर दुसरा युजर म्हणाला, ‘ती आपल्या मुलीचा ड्रेस घालून आली आहे असे दिसते.’ अभिनेत्रीच्या या विचित्र वागण्यावरही अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत कोणी म्हणाले की, ‘तुमच्या लठ्ठपणाबद्दल असा दृष्टिकोन बाळगणे योग्य नाही.’

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री दो पत्ती मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात काजोलशिवाय क्रिती सेनन देखील दिसणार आहे, ज्याची ती निर्मितीही करणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी काजोल खूपच उत्सुक दिसत आहे काजोल म्हणते, “त्रिभंगा आणि लस्ट स्टोरीज 2 नंतर, मला नेटफ्लिक्ससोबत एका चित्रपटासाठी काम करताना खूप आनंद होत आहे. मला या चित्रपटात काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळणार असून जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. दो पट्टीमध्ये साहस आणि रहस्य दोन्ही पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मी माझ्या वडिलांना घाबरतो आणि माझी मूलं मला घाबरतात…’ सनी देओलने सांगितले सुखी कुटुंबाचे रहस्य
आर्थिक परिस्थितीशी झुंज देत ‘या’ अभिनेत्रीने निवडला शेवटचा पर्याय, स्वतःच्या घरात गळफास घेऊन संपवले आयुष्य

हे देखील वाचा