Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड अच्छा तर ‘हे’ रहस्य आहे काजोलचे गोरे होण्यामागे, पोस्ट शेअर करत केला खुलासा

अच्छा तर ‘हे’ रहस्य आहे काजोलचे गोरे होण्यामागे, पोस्ट शेअर करत केला खुलासा

बॉलिवूडमधील अतिशय उत्तम आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे काजोल. काजल म्हणजे नुसता सळसळता उत्साह. ती नेहमीच चित्रपटांसोबतच विविध कार्यक्रमांना जाते तेव्हा तिथे ऊर्जा भरून देते. काजोलने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. अतिशय कमी वयात तिने मोठे यश पाहिले. काजोल मागील अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. एवढ्या वर्षांमध्ये नक्कीच तिच्यात मोठा फरक पडला आहे. सर्वच बाबतीत दिसण्याच्याही बाबतीत काजोल जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा ती जरा सावळी होती, मात्र आता ती गोरीपान दिसते. तिच्यात झालेल्या या रंगाच्या फरकामुळे अनेकदा तिला यावर प्रश्न विचारला जातो. मात्र आता काजोलने या प्रश्नावर स्वतःहून उत्तर दिले आहे.

पूर्वीच्या आणि आताच्या काजोलमध्ये जमीन आसमानाचा फरक आला आहे. तिला नेटकऱ्यांकडून किंवा मीडियाकडून अनेकदा रंगावरून टार्गेट करत बरेच प्रश्न विचारले जातात. आता काजोलने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या या प्रश्नावर उत्तर दिले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

काजोलने जो फोटो पोस्ट केला त्यात आपण पाहून शकतो काजोल तिचा पूर्ण चेहरा झाकून उभी आहे. तिचे पूर्ण चेहरा झाकला जाईल असे मास्क घातले असून, त्यावर गॉगल देखील लावला आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “हे उत्तर त्या लोकांसाठी जे मला सतत विचारतात की, मी गोरी होण्यामागे काय रहस्य आहे.” आता काजोलचे हे उत्तर पाहून नक्कीच तुम्हाला तुमचे हसू आवरले जाणार नाही. तिच्या या पोस्टवर अनेकांनी हसण्याच्या ईमोजी पोस्ट केल्या आहेत.

तत्पूर्वी काजोलने बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ‘सलाम वेंकी’ या सिनेमात काम केले. मात्र तिचा हा सिनेमा काही चालला नाही. आता लवकरच तिचा हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
यालाच म्हणतात खरे प्रेम! शून्य डिग्री तापमानात उमेश कामतने प्रियासाठी दिली प्रेमाची परीक्षा

मल्याळम सिनेमातील पहिल्या अभिनेत्री असूनही पीके रोझी यांनी ‘या’ कारणामुळे काढले त्यांचे संपूर्ण आयुष्य अज्ञानात

हे देखील वाचा