Wednesday, July 3, 2024

लग्नाआधी ‘हा’ होता काजोलचा क्रश, आज आहे बॉलीवुडमधील आघाडीचा अभिनेता

अभिनेत्री काजोल ही नेहमीच आपल्या दर्जेदार अभिनय आणि आपल्या चूलबुल्या नटखट स्वभावासाठी बॉलिवुडमध्ये ओळखली जाते. १९९९ मध्ये काजोलने अजय देवगणसोबत लग्न करून आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली होती. मात्र खूप लोकांना माहीत असेल की, अजय देवगणसोबत लग्न होण्याआधी काजोलला तर बॉलिवुडचा राऊडी राठोड अक्षय कुमारवर खूप मोठे क्रश होते. या गोष्टीचा खुलासा दुसरे कोणी नाही, तर चक्क सिनेनिर्माता करण जोहर याने केले आहे.

अभिनेता अक्षय कुमार हा जबरदस्त फिटनेस आणि चार्मिंग लुक यामुळे नेहमीच साऱ्या तरुणींच्या दिलाची धडकन बनून राहिला आहे. परंतु आपल्या उमेदीच्या काळातसुद्धा अक्षय कुमारसाठी मुली तितक्याच वेड्या होत्या. यामध्ये काजोलसुद्धा सामील होती हे काही अपवादात्मक किंवा नवीन नाही. (kajol huge crush on akshay kumar before ajay devgan)

काजोलला पहिल्याच नजरेत अक्षय कुमार आवडला असल्याचा किस्सा नुकताच करण जोहरने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितला. काजोल आणि करण हे नुकतेच पाहूणे कलाकार म्हणून शोमध्ये आले होते. त्यावेळी कारण जोहर म्हणाला की, एका पार्टीमध्ये काजोल करणसोबत फिरून अक्षय कुमारला शोधत होती मात्र तो काही भेटला नाही. पण यामुळे काजोल आणि करण हे मात्र जिवलग मित्र मात्र जरूर बनले.

हा किस्सा ऐकताना काजोल मात्र चांगलीच लाजेने तोंड लपवत असताना दिसून आली. हा सर्व किस्सा ऐकताना शोचा होस्ट कपिल शर्मा आणि प्रेक्षक चांगलेच हसत काजोलची मज्जा घेत दिसत होते.

सन १९९९ मध्ये अजय देवगणसोबत विवाह बंधनात अडकल्यानंतर काही वर्ष काजोल बॉलिवुडच्या चंदेरी दुनियेपासून पासून लांब राहिली. काजोल आणि अजय देवगण यांना न्यासा आणि युग अशी २ अपत्ये आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा