Sunday, June 2, 2024

काजोलने घेतले मुलगा युगसोबत माँ दुर्गाचे दर्शन, तनिषा आणि दिग्गज अभिनेत्री तनुजा देखील झाल्या स्पॉट

बॉलिवूड अभिनेत्री काजोल दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दुर्गा पूजेचा सण तिच्या कुटुंबासोबत साजरा करत आहे. शुभ अष्टमीच्या निमित्ताने काजोल पुन्हा एकदा मुखर्जी कुटुंबाने आयोजित केलेल्या ‘उत्तर मुंबई दुर्गा पूजा समिती’च्या पंडालमध्ये पोहोचली होती. तेथे पोहोचल्यानंतर तिने माँ दुर्गाचे दर्शन घेतले. विशेष गोष्ट अशी आहे की, यावेळी काजोलसोबत तिचा मुलगा युग सुद्धा दर्शनासाठी पोहोचला होता. तर काजोलची आई तनुजा आणि बहीण तनिषा मुखर्जी देखील शुभ अष्टमीच्या विशेष प्रसंगी माँ दुर्गाचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्या होत्या. या दरम्यान संपूर्ण मुखर्जी कुटुंब पारंपारिक लूकमध्ये खूपच आकर्षक दिसत होते.

दुर्गापूजेच्या निमित्ताने काजोल सोनेरी बॉर्डर असलेल्या सुंदर निळ्या साडीत दिसली. काजोलने या साडीवर कानात मॅचिंग सोनेरी झुमके घातले होते. या पारंपरिक लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. दुसरीकडे, तनिषा मुखर्जी माध्यमांशी बोलताना कोरोना काळात दुर्गा उत्सव साजरा करण्याविषयी आणि त्याबद्दल घेतल्या जाणाऱ्या खबरदारीबद्दल बोलली. शिवाय ती दरवर्षी दुर्गा उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असते. सणांच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबासह नटण्या मुरडण्याचा आनंद घेता येतो. कुटुंबासोबत वेळ घालवता येतो.

यापूर्वी, अभिनेत्री मौनी रॉयने देखील पारंपारिक बंगाली साडी परिधान करत माँ दुर्गाचे आशीर्वाद घेण्यासाठी आली होती. पण ती जास्त वेळ या पंडालवर थांबली नाही आणि माँ दुर्गाचा आशीर्वाद घेऊन लगेच निघून गेली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि त्यांची पत्नी सुनीता गोवारीकर देखील पूजेत दिसले. दोघांनी मिळून मा दुर्गाचे आशीर्वाद घेतले. काजोलचे काका देब मुखर्जी आणि चुलत भाऊ शर्बानी मुखर्जी देखील उपस्थित होते.

काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती देवी या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. याशिवाय तिचा ‘त्रिभंगा’ हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. सध्या ती आता ‘द लास्ट हुर्रे’ या चित्रपटाचा एक भाग आहे. त्याबद्दल अद्याप बरीच माहिती उघड करण्यात आली नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महाअष्टमीचे निमित्य साधत अनुष्काने शेअर केला वामिकाचा फोटो, म्हणाली ‘रोज तुझ्यात…’

‘या’ कलाकारांनी गुपचूप लग्न करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

हे देखील वाचा