Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड ‘या’ कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी मागितली प्रभासच्या चाहत्यांची माफी; वाचा संपूर्ण प्रकरण

‘या’ कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी मागितली प्रभासच्या चाहत्यांची माफी; वाचा संपूर्ण प्रकरण

‘कल्की 2898 एडी’ आता रिलीजच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांचा उत्साहही वाढत आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये तिकिटांचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. उत्तर अमेरिकेतही तिकीटांची वेगाने विक्री होत आहे. अनेक मोठ्या कलाकारांची भूमिका असलेला हा चित्रपट 27 जून 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे आणि रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपला सहकलाकार प्रभासच्या चाहत्यांची माफी मागितली आहे.

अलीकडेच, चित्रपट निर्मात्यांनी यात काम करणाऱ्या कलाकारांच्या मुलाखती जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये अमिताभ बच्चन एका गोष्टीसाठी प्रभासच्या चाहत्यांची माफी मागताना दिसले. अमिताभ म्हणाले की, जेव्हा दिग्दर्शक नाग अश्विन चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत एक फोटो आणला होता. त्याची आणि प्रभासची व्यक्तिरेखा कशी असेल हे चित्र दाखवायचे होते. त्या फोटोत अमिताभ बच्चनचे पात्र प्रभासच्या पात्राला ढकलत होते. ही गोष्ट सांगितल्यानंतर बिग बी म्हणाले की, मी हात जोडून माफी मागतो आणि प्रभासच्या चाहत्यांनी मला माफ करा.

‘कल्की 2898 एडी’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे, ज्यामध्ये प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय कमल हासन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, मृणाल ठाकूर, मालविका नायर, शोभना, पशुपती, अण्णा बेन, ब्रह्मानंदम आणि राजेंद्र प्रसाद देखील दिसणार आहेत. अभिनय या चित्रपटाची निर्मिती वैजयंती मुव्हीजने केली आहे. दरम्यान, संतोष नारायणन यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

नागार्जुनच्या बॉडीगार्डने अपंग चाहत्याला ढकल्याने अभिनेता ट्रोल; सोशल मीडियावर मागितली माफी
आमिर खानच्या मुलाचा पहिला चित्रपट ‘महाराज’ प्रदर्शित; प्रेक्षकांना भावला चित्रपट

हे देखील वाचा