Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘कल्की 2898 एडी’चा नवा विक्रम, मोडला ‘बाहुबली’चा रेकॉर्ड

‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD) चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. 27 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. आता ‘कल्की 2898 एडी’ ने 9व्या दिवसाच्या कलेक्शनसह ‘बाहुबली – द बिगिनिंग’ या ऑल टाइम कमाईचा विक्रम मोडला आहे.

SACNILC च्या अहवालानुसार, ‘कल्की 2898 AD’ ने पहिल्या दिवशी 95.3 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 59.3 कोटींची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी 66.2 कोटींचा व्यवसाय केला. प्रभासच्या चित्रपटाने चौथ्या दिवशी 88.2 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 34.15 कोटी रुपये आणि सहाव्या दिवशी 27.05 कोटी रुपयांची कमाई केली.

‘कल्की 2898 एडी’ने सातव्या दिवशी 22.25 कोटी आणि आठव्या दिवशी 22.4 कोटींची कमाई करून 400 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. आता नवव्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकडेवारीसह, चित्रपटाने ‘बाहुबली – द बिगिनिंग’चा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 17.25 कोटींची कमाई केली असून देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या एकूण कलेक्शनने 419.26 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

प्रभासचा ‘बाहुबली – द बिगिनिंग’ 2015 साली प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 418 कोटींची कमाई केली. हा चित्रपट आजपर्यंत सर्वाधिक कमाई करणारा 8वा चित्रपट होता. पण ‘कल्की 2898 एडी’ने 432.1 कोटींची कमाई करत ‘बाहुबली – द बिगिनिंग’ला मागे टाकले आहे. ‘कल्की 2898 एडी’चे पुढील लक्ष्य ‘गदर 2’ आहे. सनी देओलचा हिट चित्रपट ‘गदर 2’ ने बॉक्स ऑफिसवर 525.50 कोटींची कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ दिवशी नेटफ्लिक्सवर उलगडणार राजामौली यांच्या यशाचे रहस्य. डॉक्युमेंट्रीच्या रिलीजची तारीख निश्चित
आलियाच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपटाच्या नावाचे झाले अनावरण, शूटिंगचा पहिला व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा