Monday, June 9, 2025
Home कॅलेंडर फक्त ‘कल्की’ नव्हे तर या अभिनेत्री देखील लग्नाअगोदर बनल्यात आई! अनेक धक्कादायक नावे यादीत; जाणून घ्या

फक्त ‘कल्की’ नव्हे तर या अभिनेत्री देखील लग्नाअगोदर बनल्यात आई! अनेक धक्कादायक नावे यादीत; जाणून घ्या

मंडळी, बॉलिवूडचा जलवा जगभरात इतक्या मोठ्या प्रमाणात पसरतोय की विविध देशातील अभिनेत्री, मॉडेल्स या बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी भारतात येतात. याची उदाहरणंच द्यायची झाली तर कतरीना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही आणि कल्की केकला ही काही नावं घेता येतील.

यापैकीच एक कल्की केकला हीचा आज वाढदिवस आहे. ती आज ३७ वर्षांची झाली आहे. परंतु आपल्याला ठाऊक आहे का की कल्की ही एका मुलीची आई देखील आहे. हो आपण म्हणाल की तिचा तर घटस्फोट झालाय अनुराग सोबत, मग कसं काय शक्य आहे? तर सांगतो, कल्की गेल्या दोन वर्षांपासून गाय हर्षबर्ग याच्यासोबत नात्यात आहे. आणि मागच्याच वर्षी ती त्याच्या मुलाची आईदेखील झाली आहे.

चला तर मग बघुयात आणखीन अशा कोणकोणत्या बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्या लग्नाअगोदरच गरोदर राहिल्या होत्या!

कल्की केकला – गाय हर्षबर्ग

अनुराग कश्यपशी घटस्फोट घेतल्यानंतर कल्की तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली. कल्की आजकाल गाय हर्शबर्गसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे. २०२० च्या फेब्रुवारीमध्ये तिने आपल्या पहिल्या मुलास जन्मही दिला आहे.

kalkikoechlin with boyfriend
kalkikoechlin with boyfriend

अद्यापही, कल्की आणि तिचा प्रियकर गाय हर्षबर्ग यांनी लग्न केलेलं नाही. याबद्दल बोलताना, कल्कीने सांगितलं होतं की, ‘आम्ही आमच्या लग्नाला विरोध करत नाही परंतु मी फक्त गर्भवती असल्यामुळं आम्हाला लग्नदेखील करायचं नाही. आमच्या मुलाची कागदपत्रे आणि शाळा नोंदणीसाठी कधी गरज भासल्यास आम्ही त्यावर नक्की विचार करू.’

नेहा धुपिया – अंगद बेदी

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी मे २०१८ मध्ये आनन-फानन येथे मोठ्या थाटामाटात लग्न केलं. लग्नानंतर लगेच जुलैमध्ये गरोदर असल्याची बातमी स्वतः माध्यमांना दिली. यानंतर लगेच नोव्हेंबर २०१८ मध्ये कन्या मेहेर हिला जन्म दिला आणि आई झाली. यावरून सर्वांना कळालं की नेहा ही लग्नाआधीच गरोदर राहिली होती.

एमी जॅक्सन

अभिनेता अक्षय कुमारससोबत चित्रपट सिंग इज ब्लिंग आणि 2.0 मध्ये झळकलेली अभिनेत्री एमी जॅक्सन देखील तिच्या लग्नाअगोदरच प्रेग्नंट होती. तसेच तीने कुमारी माता होणे पसंत करत अगोदरच मुलाला जन्म दिला होता.

amy-jakson
amy jakson

महत्वाचं म्हणजे एमीने बॉयफ्रेंड जॉर्ज याच्यासोबत अद्याप लग्न केलेले नाही, परंतू ते लिव इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत.

श्री देवी – बोनी कपूर

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी देखील एक अशी अभिनेत्री आहे जी लग्नाआधीच गर्भवती झाली होती. श्रीदेवी बोनी कपूर यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. १९९६ मध्ये दोघांनी लग्न केले आणि काही महिन्यांनंतर श्रीदेवीने जान्हवी कपूरला जन्म दिला. श्रीदेवी या बोनी कपूर यांच्या द्वितीय पत्नी होत्या.

नीना गुप्ता – विव्हियन रिचर्ड्स

नीना गुप्ता वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटर विव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत प्रेमसंबंधात होती. हे दोघे इतके जवळ आले की नीना या विव यांच्यापासून गरोदर राहिल्या होत्या. नीना यांचं लग्न व्हिव्हियन यांच्याशी झालंच नाही परंतु असं असूनही त्यांनी कुमारी माता होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी मुलगी मसाबाला जन्म दिला.

Nina Gupta
Nina Gupta

नीना यांनी पुढे कधीच लग्न केलं नाही आणि एकट्याने खंबीरपणे कन्या मसाबाचा सांभाळ केला. आज मसाबा स्वतंत्र फॅशन डिझायनर आहे.

सारिका – कमल हसन

हे दाक्षिणात्य कलाकार जोडपं एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालं होतं. इतकं की लग्नाआधीच सारिका या गर्भवती राहिल्या. १९८६ साली त्यांनी कन्या श्रुती हिला जन्म दिला. श्रुतीच्या जन्मानंतर तब्बल दोन वर्षांनी कमल हसन यांनी सारिका यांच्याशी लग्न केलं आणि आज हे तिघेही खूप सुखात राहत आहेत.

sarika Hasan
sarika Hasan

कोंकणा सेन शर्मा – रणवीर शौरी

अभिनेत्री कोंकणाने २००७ मध्ये रणवीर शौरी याला डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी सप्टेंबर २०१० मध्ये लग्न केले आणि त्यानंतर फक्त सहा महिन्यांनंतर कोंकणाने मुलगा हारूनला जन्म दिला ज्यामुळे हे स्पष्ट झालं की लग्नाआधीपासूनच ती गर्भवती होती.

हे देखील वाचा