अभिनेत्री कल्की कोचलीनने निवडक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, तीने आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडली आहे. आता ती ज्येष्ठ कलाकार नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत काम करणार आहे. यामुळे तिला खूप आनंद झाला आहे. मात्र, कल्की नसीरुद्दीन शाहसोबत कोणत्याही चित्रपटात काम करत नसून, त्यांच्यासोबत स्टेजवर परफॉर्म करणार आहे. हा स्टेज शो शेक्सपियरच्या ‘किंग लिअर’ या नाटकावर आधारित असेल.
कल्कीच्या पीआर टीमने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, कल्की स्टेज शोमध्ये किंग लिअरची मुलगी कॉर्डेलियाची भूमिका साकारणार आहे. तर नसीरुद्दीन शाह किंग लिअरच्या भूमिकेत दिसणार आहे. नसीरुद्दीन शाहसोबत काम करण्यासाठी कल्की खूप खूश आहे. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये मुंबईत होणाऱ्या पृथ्वी थिएटर फेस्टिव्हलमध्ये हे नाटक सादर होणार असून, ही नाट्यप्रेमींसाठी महत्त्वाची घटना ठरणार आहे.
आपल्या स्टेज शोबद्दल उत्सुक असलेली कल्की म्हणाली, ‘महान नसीर सरांसोबत स्टेज शेअर करताना खूप आनंद झाला, ते अजूनही माझ्यासाठी थिएटरचे बादशाह आहेत! हुशार रेहान इंजिनियर दिग्दर्शित आणि प्रतिभावान इरा दुबे निर्मित, नाटकात अविश्वसनीय कलाकार आहेत – डेन्झिल स्मिथ, जिम सर्भ, नील भूपालम, इरा दुबे, शीना खालिद इ.
कल्कीने २००९ मध्ये ‘देव डी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता, ज्यांच्याशी कल्कीने २०११ मध्ये लग्न केले होते. मात्र, दोघेही २०१५ मध्ये वेगळे झाले. ‘देव डी’ व्यतिरिक्त कल्कीने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘गली बॉय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मेड इन हेवन’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ सारख्या प्रोजेक्टसाठी कल्कीचे खूप कौतुकही झाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
शिवांगीसोबत लग्नाच्या अफवांना साईने लावला पूर्णविराम ! आम्ही फक्त चांगले मित्र आहोत…