‘बिग बॉस ओटीटी 3’ चा फायनलिस्ट साई केतन रावने जेव्हा ‘मेहंदी है रचने वाली’ ची सहकलाकार शिवांगी खेडकरसोबतच्या त्याच्या नात्याची पुष्टी केली त्यानंतर तो प्रकाशझोतात आला. शिवांगीसोबतच्या त्याच्या डेटिंगच्या अफवा अनेक वर्षांपासून सुरू आहेत. पण साईने आता या बातम्यांचे खंडन केले आहे आणि त्यांच्या नात्याबद्दल खरे सांगितले आ हे.
बिग बॉस ओटीटी 3 च्या वीकेंड का वार भागादरम्यान, अनिल कपूरने साईला त्याच्या नातेसंबंध आणि लग्नाच्या योजनांबद्दल आणि तो शिवांगीशी लग्न करणार आहे का? असे विचारले होते. अभिनेत्याने नंतर याची खात्री केली. बिग बॉस ओटीटी 3 मधून बाहेर पडल्यानंतर साईने त्याच्या स्वतःच्या विधानाचे खंडन केले आहे.
माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे अभिनेत्याने म्हटले आहे. याबद्दल बोलताना साई म्हणाला, “हे तुमचं मत आहे, पण त्या दिवशी स्टेजवर अनिल कपूर सरांनी दोन गोष्टी सांगितल्या होत्या, एक शिवांगी जी माझी मैत्रीण आहे आणि एक लग्नाबद्दल. मी लग्नाला होकार दिला. मला या वर्षी किंवा पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे, बघूया कोणासोबत.”
शोमधील त्याच्या विधानावरून असे वाटते आहे की त्याने शिवांगीशी लग्न करण्यास सहमती दर्शवली आहे. याबाबत विचारले असता, अभिनेता म्हणाला, “अर्थात, मला माहित आहे की असेच वाटत आहे.” पण हे अजून पूर्णपणे स्पष्ट नाहीये. मी शिवांगीला तिच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. एकमेकांबद्दल बोलायचे तर आम्ही चांगले मित्र आहोत आणि आम्ही नेहमीच एकमेकांना नेहमीच सपोर्ट केला आहे. केवळ बिग बॉसमध्येच नाही तर बाहेरच्या जगातही तिने मला पाठिंबा दिला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
‘डर’ चित्रपटासाठी आमिर खान होता पहिली पसंती; या कारणामुळे नाकारला चित्रपट…