दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Hasan) यांचा ‘विक्रम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीपासूनच या चित्रपटाने कमाईचे नवनवे रेकॉर्ड करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आत्तापर्यंत या चित्रपटाने कमाईची ही घोडदौड चालू ठेवत 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘विक्रम’ चित्रपटाचे प्रमुख अभिनेते कमल हासन यांनी या यशानंतर त्यांच्या कमाईचे नियोजन सांगितले आहे. इतकेच नाही तर या मुलाखतीत त्यांनी कुटुंबियांबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. काय आहे कमल हासन यांचे आर्थिक निजोजन चला जाणून घेऊ.
कमल हासन हे दाक्षिणात्य सिनेजगतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार भूमिकांनी आणि अभिनयाने त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला विक्रम चित्रपटाने कमाईचे नवनवे विक्रम केले आहेत. या यशानंतर कमल हासन यांनी आपल्या आर्थिक नियोजनाबद्दल महत्वाचे वक्तव्य केले आहे.ज्यामध्ये ते म्हणतात की, या कमाईतून पहिल्यांदा ते त्यांचे कर्ज चुकते करणार आहेत.तसेच ते आयुष्यभर त्यांच्या आवडीचे अन्न खातील, तसेच त्याच्या कुटुंबाला आणि मित्रांना जे काही देता येतील ते देईल.”
याबद्दल पुढे बोलताना कमल हसन म्हणतात की, “हे सर्व केल्यानंतर, जेव्हा देण्यासारखे काही उरले नसेल तेव्हा असे असे म्हणू शकतो की आता माझ्याकडे देण्यासारखे काही उरले आहे. मला माझ्यासाठी काहीही नको, मला माझ्या पैशाचा दिखावा करायचा नाही तर मला एक चांगला माणुस बनायच आहे.”दरम्यान कमल हासन यांच्या ‘विक्रम’ चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. त्याचबरोबर विजय सेतुपती, फहाद फासिल, कालिदास जयराम, नारायण, अँटनी वर्गीस आणि अर्जुन दास यांच्याही चित्रपटात दमदार भूमिका आहेत.
अभिनेता सुर्याही या चित्रपटात छोट्या भूमिकेतही दिसला आहे, जिथे तो रोलेक्सची भूमिका साकारताना दिसत आहे. सध्या कमल हासन यांच्या या चित्रपटाची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरू आहे. याआधी कमल हासन यांनी इंडियन, इंडियन २ अशा अनेक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच ते राजकारणातही नेहमीच सक्रिय असतात.
हेही वाचा –
–आलिया भट्टने राहाचा पहिला वाढदिवस केला खास अंदाजात साजरा, दाखवली मुलीची झलक
–सारा अली खानने शेअर केले तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो; म्हणाली, ‘फिटनेस एक जर्नी आहे…’