Thursday, April 25, 2024

‘विक्रम’च्या यशाने आनंदित झालेल्या कमल हासन यांनी अभिनेता सूर्याला दिले खास गिफ्ट, किंमत ऐकूण व्हाल थक्क

साऊथ सुपरस्टार कमल हासन (Kamal Hasan) यांचा चित्रपट ‘विक्रम’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणारा कमल हासन या चित्रपटाला मिळालेल्या उत्तुंग यशाने खूप खूश आहे. यामुळेच तो या प्रोजेक्टशी संबंधित कलाकार आणि टीमला खास भेट देत आहेत. अलीकडेच या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला लोकेश कनगराजपासून ते टेक्निशियन्स पर्यंत सर्वांनाच भरभरून भेटवस्तू दिल्या आहेत. आता कमल यांनी चित्रपटात छोटी भूमिका साकारणाऱ्या तमिळ अभिनेता सुर्यालाही (Suriya) एक अनमोल भेट दिली आहे. सूर्याने ट्विटरवर फोटो शेअर करून कमल हासन यांचे आभार मानले आहेत.

सुर्याने नुकतेच त्याच्या ट्विटर हँडलवरून स्वतःचे आणि कमल हासन यांचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कमल हासन सूर्याला रोलेक्स घड्याळ भेट देताना दिसत आहेत. फोटोसोबत सुर्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘असे क्षण आयुष्य अधिक सुंदर बनवतात. या रोलेक्सबद्दल अण्णांचे आभार.’ महत्वाचे म्हणजे अभिनेता सुर्याचे चित्रपटातील नावही रोलेक्सच आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घड्याळाची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. कमल हसन यांनी विक्रमचे दिग्दर्शक लोकेश कनागराज यांना सूर्यापूर्वी एक कार भेट दिली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. याशिवाय या प्रकल्पाशी संबंधित असिस्टंट डायरेक्टर्सना त्यांनी Apache 160 बाइक भेट दिली होती.

दरम्यान कमल हासन यांचा नवीन चित्रपट ‘विक्रम’ 3 जूनपासून थिएटरमध्ये सातत्याने चांगली कमाई करत आहे. चित्रपटाची कथा लोकांच्या पसंतीस उतरली आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाचे कलेक्शन उत्कृष्ट ठरले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 125 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘विक्रम’मध्ये कमल हसन व्यतिरिक्त विजय सेतुपती, फहद फासिल आणि सुरिया या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा-

सोनम कपूरचे सुंदर फोटो शेअर करत अनिल कपूर यांनी लाडक्या लेकीला दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

अभिनेत्री ईशा देओलच्या बोल्डनेसने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

‘असं वाटतंय आता पळून यावं महाराष्ट्रात’, प्राजक्ता नेमकी कुठे अडकलीये?

हे देखील वाचा