Tuesday, December 3, 2024
Home साऊथ सिनेमा लेकी श्रुतीसोबत चित्रपटात काम करणार कमल हसन, लोकेश कनागराज करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

लेकी श्रुतीसोबत चित्रपटात काम करणार कमल हसन, लोकेश कनागराज करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या पुढील चित्रपटात अभिनेत्री श्रुती हासन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाशी कमल हसनही जोडले गेले आहेत. तो या चित्रपटाचा निर्माता आहे. कमल हसनच्या (Kamal Hassan) प्रोडक्शन हाऊस ‘राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल’ (RKFI) ने हा चित्रपट लोकेश कनागराज दिग्दर्शित करण्याची घोषणा केली. यासोबतच चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.

कमल हासनच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘विक्रम’च्या जबरदस्त यशानंतर लोकेशचा RKFI सोबतचा हा दुसरा प्रोजेक्ट असेल. मात्र, या चित्रपटाच्या नावाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कमल हासन त्यांची मुलगी श्रुती हसनसाठी पहिल्यांदाच चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मात्र, याआधीही दोघांनी चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्याचबरोबर श्रुती हासननेही तिच्या वडिलांच्या चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली आहेत.

श्रुती हसनने 2023 मध्ये ‘वीरा सिम्हा रेड्डी’, ‘सलार’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर ती 2024 मध्ये ‘डकैत’ आणि ‘चेन्नई स्टोरी’मध्ये दिसणार आहे. तर दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो ‘कैथी 2’, ‘विक्रम 2’ आणि ‘रोलेक्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणार आहे. याशिवाय लोकेश रजनीकांतसोबत एक चित्रपटही करणार आहे. मात्र हा चित्रपट कधी फ्लोरवर जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

विजय थालापतीच्या राजकीय प्रवेशाबाबत रजनीकांत यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
‘ॲनिमल’च्या यशानंतर फी वाढल्याच्या बातमीवर रश्मिका म्हणाली, ‘मी यावर विचार करत आहे…’

 

हे देखील वाचा