Wednesday, July 3, 2024

विवादाचा राजा कमाल आर खान झाला ४५ वर्षांचा, पाहूयात कसे आहे त्याचे २१ हजार स्क्वेअर फुटाचे आलीशान घर

स्वतःला नं १ क्रिटिक आणि ट्रेड एनालिस्ट सांगणारा केआरके काल ४५ वर्षांचा झाला. १ जानेवारी १९७५ साली कमाल रशीद खानचा जन्म झाला. नेहमी विवादित मते मांडणारा आणि विवादाशी जवळचे नाते असणारा केआरके याचे जीवन खूप वेगळे आणि रंजक आहे. जाणून घेऊया त्याच्या आयुष्याशी निगडित काही गोष्टी.

कमाल खान सांगतो की, तो दुबईमध्ये २१ हजार स्वेयर फुटच्या घरात राहतो. त्याच्याकडे येणारे दूध हे हॉलंड मधून येते तर चहापत्ती लंडनवरून येते.

कमाल सांगतो की, त्याच्या घराचा पुढचा भाग हा काचेचा असून त्यावर पुढे मोठ्या अक्षरात लाल रंगात R लिहले असून ग्रे रंगात दोन्ही K आहेत.

केआरकेचा बंगला दुबईमध्ये असून त्या बंगल्याचे नाव ‘जन्नत’ आहे. त्याच्या घरात लिविंग रूम, कॉरिडोर आणि जिम आहे. घराच्या प्रत्येक भिंतीवर मोठे मोठे फोटो लावले आहेत.

सध्या कमाल खान मुंबईमध्ये गारमेंट्सचा उद्योग करत असून त्याच्या उद्योगाचा टर्नओव्हर १००० करोड रुपये इतका आहे. कमाल खान आणि त्याचा भाऊ हा बिझनेस चालवतात. त्यांचे उत्पादन गल्फ कंट्रीज आणि यूके मध्ये निर्यात केला जातो.

केआरकेचे मुंबईतील ऑफिस वर्सोवा भागात आहे. जर केआरकेला ट्विटरवर एखादा माणूस आवडला नाही तर तो त्या माणसाला ‘2RSPpl’ म्हणजेच ‘दो कौड़ी के लोग’ असे संबोधतो.

केआरके सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.तो बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना नेहमी वाईट साईट बोलत असतो, आणि याचमुळे अनेकदा वाद ओढवून घेत असतो. केआरके चे एका यूट्यूब चॅनेल सुद्धा आहे ज्यात तो चित्रपटांचे समीक्षण करत असतो.

एक अभिनेता म्हणून केआरकेने ‘देशद्रोही’ सिनेमातून पदार्पण केले. हा सिनेमा महाराष्ट्रात बॅन केला होता. त्यानंतर केआरके २०१४ साली आलेल्या ‘एक व्हिलन’ सिनेमात छोट्या भूमिकेत दिसला होता. सोबतच केआरकेने बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता. ज्यात त्याने फॅशन डिझायनर रोहितला बाटली फेकून मारली होती आणि तो चर्चेत आला होता.

हे देखील वाचा