Saturday, July 6, 2024

काय सांगता! चक्क सलमान खानने दिली ‘या’ अभिनेत्याची सुपारी, ट्विट करत केला याचा खुलासा

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि अभिनेते चर्चेत येण्यासाठी काहीही करत असतात. त्यांच्या अभिनयापेक्षा अशा वादांचीच चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत असते. यामध्ये कमाल रशीद खानचे(Kamal Rashid Khan) नाव पहिल्यांदा घेतले जाते. केआरके चर्चेत येण्यासाठी नेहमीच काही ना काही बोलून प्रसिद्धी मिळवत असतो. सध्या त्याने असाच एक आरोप अभिनेता सलमान खानवर(Salman Khan) केला आहे.

कमाल रशीद खानने पुन्हा एकदा बॉलिवूडचा दबंग सलमान खानवर हल्ला चढवला  आहे. एका व्हायरल  ट्विटमध्ये केआरकेने सांगितले की, सलमान खानने त्याची सुपारी दिली आहे, ही तब्बल 50 कोटींची डील आहे. अनेकदा वादात सापडणाऱ्या कमाल रशीद खानने (केआरके) आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. ज्या व्यक्तीने केआरकेचा कॉन्ट्रॅक्ट दिल्ली आणि मुंबई पोलिसांना दिला आहे त्याचे नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, केआरकेने पुन्हा एकदा सलमान खानवर हल्ला चढवला आहे. दबंग खानकडून जीवाला धोका असल्याचे त्याने सांगितले आहे. केआरकेने लागोपाठ अनेक ट्विट करत याचा खुलासा केला आहे. या ट्विटनुसार, केआरकेला एक मेसेज आला ज्याने स्वत:ला केंद्रीय मंत्र्याचे पीए संजय असल्याचे सांगितले आहे. या व्यक्तीने केआरकेला बरीच माहिती दिल्याचे सांगितले. या व्यक्तीने पेन ड्राईव्हमध्ये खळबळजनक रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला आहे. पण या पेन ड्राईव्हसाठी KRK ला 10 लाख मोजावे लागतील. सत्य आहे की नाही माहीत नाही, पण KRK नक्कीच या सगळया घोळामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यापूर्वी त्याने शाहरुख खानला माहिती दिली होती, असा दावाही या व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीच्या दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी केआरकेने चौकशीची मागणी केली आहे. त्या व्यक्तीने केआरकेला सांगितले की सलमान खानने त्याची सुपारी घेतली आहे, केआरकेने ट्विटमध्ये लिहिले “त्या व्यक्तीने (पीए संजय) सांगितले की, “सलमान खानने (सलमान खान) माझी मुंबई आणि दिल्ली पोलिसांना 50 कोटी रुपयांची सुपारी दिली आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांचाही सहभाग आहे, मी जेव्हा भारतात येईन तेव्हा मला मारले जाईल. सलमान खान, मंत्री आणि पोलिस अधिकाऱ्यांचे रेकॉर्डिंग असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. केआरकेने दिल्ली आणि मुंबई पोलिसांना सांगितले की, त्याला कोणीतरी आधी मेल केले आणि मंत्र्याच्या पीएने माहितीसाठी संपर्क साधण्यास सांगितले. जेव्हा मी दिलेल्या नंबरवर कॉल केला तेव्हा त्याने माझ्याशी दुसर्‍या व्हॉट्सअप नंबरवरून संपर्क साधला, माझ्याकडे रेकॉर्डिंग असल्याचा दावा ही त्याने केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 नो मेकअप लूकमध्येही अतिशय सुंदर दिसणाऱ्या सपना चौधरीने पार्किंगमध्येच लगावले जोरदार ठुमके

अभिनयात करिअर करायचे नसूनही केवळ गुरुजींच्या सांगण्यावरून बनला अभिनेता, जाणून घ्या इमरान हाश्मीचे काही किस्से

‘जिच्या दिलखेचक अदांसाठी तुम्ही आतुर होता’ ती ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ साकारणार ‘ही’ आघाडीची अभिनेत्री

हे देखील वाचा