महानायक अमिताभ बच्चन ते सलमान खान, दिग्गज कलाकारांचे खरे नाव ऐकून व्हाल चकित

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांचे चित्रपट फक्त त्यांच्या नावावरच सुपरहिट होत असतात. त्यांच्या अभिनयाने त्यांंनी या क्षेत्रात आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. मात्र यामध्ये काही अभिनेते असेही आहेत ज्यांनी चित्रपट जगतात आल्यानंतर आपले मूळ नाव बदलून दुसरे नाव ठेवले होते. या अभिनेत्याचे हे नाव आता इतके प्रसिद्ध झाले आहे की, त्यांचे मूळ नाव कोणाच्या लक्षातही येत नाही. कोणते आहेत हे अभिनेते आणि काय आहेत त्यांची मूळ नावे चला जाणून घेऊ. 

बॉलिवूड जगतातील अभिनेते आणि त्यांची लोकप्रियता या गोष्टींवर नेहमीच चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. या अभिनेत्यांच्या प्रत्येक चित्रपटाची त्यांचे चाहते नेहमीच वाट पाहत असतात.त्याचप्रमाणे हिंदी चित्रपट जगतात असेही काही अभिनेते आहेत ज्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी आपले नाव  बदलले आहे, याच अभिनेत्यांबद्दल.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपट जगतात त्यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या इतकी लोकप्रियता क्वचितच कोणाला मिळत असते. बॉलिवूडमधील सर्वात दिग्गज अभिनेते म्हणून त्यांच्या नावाचा दबदबा आहे. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की, अमिताभ बच्चन यांचे खरे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे आहे.

मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty)
९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते म्हणून मिथून चक्रवर्ती यांचे नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने मिथून चक्रवर्ती यांनी अनेक पुरस्कारांना गवसणी घातली आहे. मात्र तुम्हाला माहित नसेल की, मिथून चक्रवर्ती यांचे खरे नाव गौरंगा चक्रवर्ती असे होते जे त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी बदलले.

सलमान खान (Salman Khan)
चित्रपट जगताचा दबंग म्हणून सलमान खानचे नाव घेतले जाते. सलमान खानच्या अभिनयाची आणि स्टारडमची नेहमीच हिंदी चित्रपट जगतात चर्चा होत असते. आजही सलमान खानचा प्रत्येक चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये सुपरहीट ठरलेला असतो हे त्याची लोकप्रियता आणि दमदार अभिनयाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट सहज १०० कोटीचा आकडा पार करत असतो. अभिनेता सलमान खाननेही चित्रपट जगतात येण्याआधी आपले नाव बदलले असून त्याचे मूळ नाव अब्दुल राशीद खान असे आहे.

अक्षय कुमार(Akshay Kumar)
अक्षय कुमार हा हिंदी चित्रपट जगतातील मिस्टर खिलाडी म्हणून ओळखला जातो. ९० च्या दशकापासून अनेक सुपरहीट चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारला फिट आणि हिट अभिनेता म्हणून सगळीकडे ओळखले जाते. अक्षय कुमारनेही चित्रपटात येण्याआधी त्याचे राजीव हरीओम भाटिया हे मूळ नाव बदलून अक्षय कुमार अस ठेवले होते.

सैफ अली खान (Saif Ali Khan)
अभिनेता सैफ अली खान हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या अभिनयाची आणि दमदार लूकची कायम चर्चा होताना दिसत असते. सैफने अनेक दमदार चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. चित्रपट जगतात येण्याआधी सैफ अली खानचे नाव साजिद अली खान असे होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post