Monday, April 15, 2024

दलाई लामा आणि बाइडन यांच्या मैत्रीवर केलेली ‘ती’ पोस्ट क्वीनच्या अंगाशी, ऑफिसच्या बाहेर निर्दशने पाहून कंगनाने मागितली माफी

जगभरातील प्रसिद्ध १४ वै तिबेटियन अध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा यांचा एक विवादित व्हिडिओ मागील काही दिसवांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका नाबालिक मुलाला ओठांवर किस करताना दिसत आहे. या व्हिडिओवर सामान्य लोकांपासून मोठ्या दिग्गज सेलेब्सपर्यंत सर्वांनीच त्यांच्या प्रतिक्रिया देत रोष व्यक्त केला आहे. त्यानंतर दलाई लामा यांनी माफी मागताना त्यांची बाजू देखील स्पष्ट केली. याच व्हायरल व्हिडिओवर कंगना रणौतने देखील तिच्या स्टाइलमध्ये टिप्पणी केली. तिच्या या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आणि आता तिला तिच्या त्या टिप्पणीवर माफी मागावी लागली आहे.

कंगनाने दलाली लामा यांचा एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. या फोटोमध्ये दलाई लामा यांची जीभ बाहेर आलेली होती आणि ते अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडन यांच्या बाजूला बसलेले दिसत होते. या फोटोसोबत क्वीनने लिहिले, “दलाई लामा यांचे व्हाइट हाऊसमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत झाले.” हे पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “दोघांनाही तोच आजार आहे. नक्कीच या दोघांची मैत्री होऊ शकते.”

आता कंगनाच्या या पोस्टनंतर तिला ट्रोलिंगचा आणि विरोधप्रदर्शनाचा सामना करावा लागत आहे. २१ एप्रिल रोजी कंगनाच्या ऑफिसच्या बाहेर काही बौद्ध धर्मातील लोकांनी येत प्रदर्शन सुरु केले. याचा एक व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर देखील केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “पाली हिल येथील माझ्या ऑफिस बाहेर बौद्ध लोकांचा एक समूह प्रदर्शन करत आहे. माझ्या बोलण्यामुळे मला कोणाला दुखवायचे नव्हते.”

यासोबतच तिने नमस्कार करत असलेला ईमोजी पोस्ट करत लिहिले, “हे बाइडन आणि दलाई लामा यांची मैत्री होण्यासाठी कोणाचेही नुकसान न करणारा असा एक विनोद होता. कृपया माझ्या विचारांना समजून घ्या. मी बुद्धाच्या विचारांना घेऊन चालते आणि परम पावन १४ वे दलाई लामा यांनी त्यांचे जीवन पूर्णपणे सार्वजनिक गोष्टींसाठी व्यतीत केले आहे. मी कोणाच्याही विरोधात नाही. या मोठ्या उष्णतेत उभे राहू नका घरी जा.”

दरम्यान कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच तिच्या आगामी इमर्जन्सी सिनेमात दिसणार आहे. यात ती इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. तिच्या सोबत या चित्रपटात मिलिंद सोमन, अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि दिवंगत अभिनेता सतीश कौशिक देखील दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘माझा संघर्ष घरात प्रसिद्ध चेहरे असल्यामुळे…’ ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिच्या कठीण काळाबद्दल

प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टवरून नेटकऱ्यांनी उडवली तिची खिल्ली विचारले, “हा कोणता खेळ आहे”

हे देखील वाचा