Saturday, July 6, 2024

…अन् ट्विंकलवर भडकली कंगना रणौत; काय आहे प्रकरण?

बॉलिवूडची ड्रामा क्विन कंगना रणौत (Kangana ranaut ) नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. कंगना नेहमी सोशल मीडियाद्वारे अनेक घटनांवर, अनेकांच्या वक्तव्यांवर परखड मत व्यक्त करताना दिसते. अशातच कंगनाने सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नावर (Twinkle khanna ) संताप व्यक्त केला आहे. ट्विंकलने केलेल्या एका वक्तव्यावर कंगना भलतीच भडकल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं काय प्रकरण? जाणून घेवुया…

एका इव्हेंटदरम्यान ट्विंकल खन्नाने पुरुषांवर भाष्य करताना त्यांची तुलना पॉलिथीन बॅगसोबत केली. त्यानंतर कंगनाने ट्विंकल खन्नाची जुनी क्लिप शेअर करत संताप व्यक्त केला.इंस्टा स्टोरी शेअर करत कंगना आपले मत व्यक्त केले आहे.

“सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणारी ही माणसं त्यांच्या पतींना प्लास्टिक बॅग म्हणत आहेत. असं बोलून आम्ही किती कूल आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे? चांदीच्या चमच्याने जन्मलेल्या या नेपो किड्सना, सोन्याच्या ताटात फिल्मी करिअर दिलं गेलं. पण त्यांना निश्चितपणे न्याय देता आला नाही. किमान या व्यक्तींना मातृत्वाच्या निःस्वार्थीपणाचा आनंद मिळू शकतोय. अशा व्यक्तींना नक्की काय व्हायचं आहे? भाजीपाला? स्त्रीवाद असाच आहे का?” असे सवाल कंगनाने ट्विंकलला केले आहेत.

नेमकं काय म्हणाली ट्विंकल?

ट्विंकल खन्नाला एका जुन्या मुलाखतीत विचारण्यात आले होते की, ती स्त्रीवादी आहे हे तिला कसे समजले? यावर ट्विंकलने सांगितले की, तिची आई डिंपल कपाडियाने तिला शिकवले होते की, महिलांना पुरुषांची गरज नसते. आपण कधी समानता आणि स्त्रीवाद या मुद्द्यांवर बोलत नाही. आपल्याजवळ एखादी चांगली प्लास्टिकची पिशवी असते तसंच आपल्या आयुष्यात पुरुषांची गरज असते. मी याच विचारसरणीत मोठी झालीय.

तसेच, आपण काहीही करत असलो तरी मुलाच्या संगोपनाची ९० टक्के जबाबदारी आपल्यावर आहे. घर सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. आपण प्रगती करत आहोत, पण आपण पुरुषांच्या बरोबरीने आहोत का? नाही. जर आपल्याला पुढे जायचे असेल तर आपल्या मुला-मुलींना शिकवावे लागेल. जेणेकरून ते येणाऱ्या पिढ्यांना समानतेची व्याख्या शिकवतील आणि समजावून सांगतील. आम्ही अजूनही लोकांच्या छोट्या विचारसरणीशी झगडत आहोत. पण एकेदिवशी आपण विजय मिळवू.” असे ट्विंकलने मुलाखतीत भाष्य केलं होतं.

बिग बॉस १६ फेम शिव ठाकरे अन् अब्दु अडचणीत; ED ने बजावलं समन्स

‘तिला माझं प्रत्येक दुःख माहित आहे..’ अंकिताने केला कंगना आणि तिच्या घट्ट मैत्रीचा खुलासा

हे देखील वाचा