Tuesday, March 5, 2024

‘तिला माझं प्रत्येक दुःख माहित आहे..’ अंकिताने केला कंगना आणि तिच्या घट्ट मैत्रीचा खुलासा

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे (ANkita lokhande) ‘बिग बॉस 17’ ची विजेती होऊ शकली नाही, याचं दुःख अजूनही पचवू शकली नाही. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताने अनेक मोठे खुलासे केले आहेत. अशातच अंकिताने तिची खास मैत्रीण म्हणजेच बी टाऊनची ड्रामा गर्ल कंगणा रणौतसोबत (Kangana Ranaut) असलेल्या नात्यावर भाष्य केले आहे. माझं दुःख काय आहे ते कंगणालाच माहिती, असं म्हणत अंकिताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एका मुलाखतीदरम्यान, अंकिताने कंगणासोबतच्या नात्यासंदर्भात मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘जेव्हा मी मणिकर्णिका चित्रपटामध्ये कंगणासोबत काम करत होते तेव्हा दोघींची मैत्री झाली. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या दोघींच्या एकसारख्या आहेत. पण मला कधीच वाटले नव्हते की, माझे आणि कंगणाचे नाते इतके घट्ट होईल. कंगना नेहमी म्हणते की, अंकिता माझ्यासारखी आहे. मला हे ऐकून खुप छान वाटतं.
‘माझ्यामुळं कंगणा चिंतेत होती.”

पुढे अंकिता म्हणाली, “बिग बॉस शोच्या प्रवासात अनेक चढ उतार आले. कधी मी खुश होते तर कधी मला अनेक गोष्टींचा त्रास होत होता. माझ्या जीवनात जे काही सुरु होत त्यामुळे कंगणा खुप चिंतेत होती. माझ्या आईसोबत कंगणाने यासंदर्भात चर्चा देखील केली. इतकेच नव्हे तर बिग बॉस शोमधून बाहेर पडल्यानंतर कंगणाने माझ्याशी संवाद साधला. मला काही गोष्टी समजावल्या.”

बिग बॉस शोदरम्यान अंकिता तिचा पती विकी जैनसोबत झालेल्या भांडणामुळे चर्चेत आली होती. आता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतरही ती चर्चेत राहिली आहे.विकीसोबत अनेक फोटो शेअर करत अंकिताने दोघांच्या भांडणाच्या चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर…‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच तिला एकापेक्षा एक प्रोजेक्ट मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत अंकिताने ‘वीर सावरकर’ चित्रपटात रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करणार असल्याची माहिती दिली. एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या शोमधून अंकिताला टेलिव्हिजनवर ओळख मिळाली. या मालिकेमुळे अंकिता रातोरात टेलिव्हिजन इंडस्ट्रीची स्टार बनली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

आमिर खानची एक्स वाइफ म्हटल्याने नाराज झाली किरण राव; म्हणाली, ‘माझी स्वतःची ओळख आहे’
घटस्फोटानंतर मानसी नाईक ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात, परदेशात साजरा करतीये व्हॅलेंटाईन वीक

हे देखील वाचा