कंगना राणौतने नुकतेच मुंबईतील जुहू येथे तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचे मोठे पोस्टर प्रदर्शित केले. या पोस्टरसोबतच तिने सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली. कंगनाचे सिनेमे म्हणजे सर्वच प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. तिच्या प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळे नक्कीच पाहायला मिळत असते. त्यामुळे तिच्या चित्रपटांची प्रेक्षकांना खूप उत्सुकता असते. ‘धाकड’ हा सिनेमा घोषित झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे खूप चर्चेत आहे.
‘धाकड’ चित्रपट ८ एप्रिल रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘धाकड’ या सिनेमाचे निर्माते असणाऱ्या दीपिका मुकुट यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला कंगना पोहचली होती, त्यावेळी तिने या चित्रपटाबद्दल अधिक माहिती दिली. यावेळी कंगनाने ‘धाकड’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होत असल्याने आनंद व्यक्त केला. ती पुढे म्हणाली, ” ‘धाकड’ हा एक थ्रिलर सिनेमा असून, अजून बॉलिवूडमध्ये असा सिनेमा तयार झालाच नाहीये. हा एक क्रांतिकारी सिनेमा असणार आहे.”
कंगना पुढे म्हणाली, “पुढच्या वर्षी ८ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होतो तो पर्यंत चित्रपटगृह १०० टक्के क्षमतेने सुरु होतील. अशी मला आशा आहे. हा सिनेमा बघताना नक्कीच तुम्हाला जाणवेल की, सिनेमा किती भव्य असणार आहे.”
‘धाकड’ या सिनेमात कंगनासोबत अर्जुन रामपाल देखील महतवाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी अर्जुनने त्याचा या सिनेमातील लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याचा लूक खूपच हटके आणि लक्षवेधी होता. लूकवरून तो एखाद्या गँगस्टर असल्याचे दिसत आहे. धाकड हा चित्रपट कंगनासाठी खूपच महत्वाचा आहे.
काही दिवसांपूर्वी कंगनाची ‘थलयावी’ हा जयललिता यांची बायोपिक असणारा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आणि कंगनाची अभिनयाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी खूपच प्रेम दिले. कंगनाला अजून एक राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असे देखील सांगण्यात आले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो
-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे










