आपल्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजामुळे सतत वादांमध्ये अडकणारी कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ सिनेमामुळे चांगलीच गाजत आहे. नेहमीच वेगवेगळ्या विषयावर चित्रपट बनवत कंगना चांगलीच लाइमलाईट्मधे येत असते. आता तिचा हा सिनेमा आणि त्यात तिने साकारलेली भूमिका खूपच उत्सुकता वाढवणारी आहे. कंगनाने या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे. तिच्यात असणाऱ्या प्रभावी अभिनेत्रीसोबतच तिने तिच्यात असणारे दिग्दर्शकीय गुणांनी तिने अनेकांना भुरळ घातली आहे. नुकतेच अभिनेते अनुपम खेर यांनी कंगनाची दिग्दर्शकीय गुणांचे कौतुक केले आहे. त्यांनी कंगनाला इंडस्ट्रीमधील उत्तम दिग्दर्शक म्हटले आहे. याला उत्तर देताना कंगनाने अनुपम यांना स्ट्रॉंग आणि सेक्युर म्हटले.
People talk about woman empowerment till they find an empowered woman and their egos want to crush her but a really strong and secure man will always protect a woman no matter how fierce/ empowered she is.@AnupamPKher ji thank you I always feel loved and appreciated around you. https://t.co/flLXQKkg7u
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 3, 2023
कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले असून, तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले, “लोकं महिला सशक्तीकरणाबद्दल तेव्हाच बोलता जेव्हा त्यांना एखादे सशक्त महिला मिळत नाही. आणि त्यांचा अहंकार ज्याला त्यांना पायदळी तुडवायचे असते. मात्र खरे तर एक मजबूत आणि सुरक्षित व्यक्ती नेहमीच स्त्रीचे रक्षण करेल. मग तो कितीही चिडका किंवा शक्स्ट असला तरी. अनुपम खेर जी धन्यवाद मला तुमच्या आसपास नेहमीच प्रेम आणि कुटून जाणवते.”
अनुपम खेर यांनी एका मुलाखतीमध्ये कंगनाची कौतुक करताना म्हटले होते की, “मला वाटते कंगना एक बहादूर मुलगी आहे. जर आपण महिला सशक्तीकरणाबद्द्दल कौतुक करतो, तेव्हा आपण कंगनाची यशाचे कौतुक केले पाहिजे. मला वाटते की उत्तम दिग्दर्शकांपैकी एक ती आहे.” तत्पूर्वी कंगनाची इमर्जन्सी चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत या सिनेमात दिसेल. तर अनुपम खेर जे पी नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतच महिमा चौधरी, विशाक नायर आणि श्रेयस तळपदे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO| तब्बल 50 वर्षानंतर मुमताज आणि धर्मेंद्र देओल पुन्हा एकत्र, पाहा व्हायरल व्हिडिओ
बिग बॉसची ही स्पर्धक दुसर्यांदा अडकणार लग्न बंधनात; मोठ्या बिझनेसमन बरोबर थाटणार संसार