Saturday, April 20, 2024

VIDEO| तब्बल 50 वर्षानंतर मुमताज आणि धर्मेंद्र देओल पुन्हा एकत्र, पाहा व्हायरल व्हिडिओ

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘इंडियन आयडल‘  गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरवर्षीप्रमानेच यावर्षी देखिल या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. अशातच यामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता धर्मेंद्र देओल आणि आणि गेल्या 50-60 च्या दशकामधील प्रेक्षकांच्या मनावर राज्या करणाऱ्या लोकप्रिय दिग्गज अभिनेत्री मुमताज या पहिल्यांदाच कोणत्यातरी कार्यक्रमात हजेरी लावली होती.

बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र टेलिव्हिजनवरील प्रसारित कार्यक्रम ‘इंडियन आयडल’मध्ये हजेरी लावणार आहेत. नुकतचं सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण पुर्ण 50 वर्षानंतर ही जोडी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे, त्यामुळे प्रत्येकचजन या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये मुमताज (Mumtaz) आणि धर्मेंद्र (Dharmendra Deol) एकत्र खूप चांगली बॉन्डींग पाहायला मिळत आहे. नेहमी प्रामानेच या भागाचं सुत्रसंचालन आदित्य नारायण (Aditya Narayan) करणार असून हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) आणि विशाल ददलानी (Vishal Dadlani) हे परिक्षण करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुमताज काळ्या रंगाच्या शिमरी गाउनमध्ये पाहायला मिळत आहेत तर धर्मेंद्रजींनी ग्रे रंगाचा सुट आणि टोपी परिधान केली आहे. यांना पाहून प्रेक्षाकांचाही आनंदा दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

मुमताज सध्या 75 वर्षाच्या आहेत मात्र त्यांच्याकडे पाहून कोणच म्हणार नाही की त्यांनी 75 वी ओलांडली आहे, गाण्यांचा अस्वाद घेत त्यासोबत त्यांनी ‘कोई शहरी बाबू’ या गाण्यावर धमाकेदार डान्सही केला आहे. सांगायचं झालं तर मुमताज यांनी 11 व्या वयापासूनच 1958 साली प्रदर्शित ‘चिड़िया’ चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी राजेश खन्ना सारख्या दमदार कलाकारांसोबतही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून ऑनस्क्रिन त्यांची जोडी सुपरहिट ठरली होती. 13 वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर मुमताजींनी 1990 साली ‘आंधिया’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनगारमन केलं होतं. पण यांनंतर नेहमीसाठीच अभिनय क्षेत्राला राम राम ठोकला. अभिनेता धर्मेंद्र यांच्या बद्दल सांगायचे झाले तर ते अजूनही अभिनयात सक्रिय असतात. त्याशिवया ते लवकरच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यामध्ये पाहायला मिळणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
‘हम तुम क्याें खामाेश है’, रुपाली भाेसलेचा ‘ताे’ व्हिडिओ पाहिलात का?
शालिन भनोटची एक्स पत्नी दलजीत कौर पुन्हा एकदा प्रेमात, ‘या’ व्यक्तीसोबत थाटणार संसार

हे देखील वाचा