Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड कंगनाच्या ‘धाकड’ची लाजीरवाणी बॉक्स ऑफिस कमाई आली समोर, ८व्या दिवशी विकली केवळ २० तिकीटे

कंगनाच्या ‘धाकड’ची लाजीरवाणी बॉक्स ऑफिस कमाई आली समोर, ८व्या दिवशी विकली केवळ २० तिकीटे

अभिनेत्री कंगणा रणौत (Kangana Ranaut) आपल्या विवादीत वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. देशातील कोणत्याही संवेदनशील मुद्द्यावर ती आपले मत व्यक्त करत असते. यामुळे अनेकदा तिला नेटकऱ्यांच्या रोशालाही सामोरे जावे लागले आहे. मात्र सध्या कंगणाच्या ‘धाकड’ चित्रपटाच्या फ्लॉप प्रदर्शनाने सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. कंगणाच्या धाकड चित्रपटाच्या आठव्या दिवशीचा कमाईचा आकडा समोर आला असून या आकड्यांवरुन चित्रपट जोरदार आपटल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अभिनेत्री कंगणा राणौतच्या ‘धाकड’ चित्रपटाची प्रदर्शनाच्या आधीपासून जोरदार चर्चा रंगली होती. हा चित्रपट जोरदार कमाई करेल असाही विश्वास अनेकांनी व्यक्त  केला होता. पण प्रत्यक्षात मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला असल्याचे आकडे समोर आले होते. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीपासून समोर आलेल्या आकड्यांवरुन चित्रपट फ्लऑप ठरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आता या चित्रपटाच्या आठव्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार ‘धाकड’ चित्रपटाचे २७ मे रोजी फक्त २० तिकीटे विकली गेली आहेत. ज्याची एकूण कमाई ४४२० रुपयांची कमाई झाली आहे. हे लाजिरवाणे आकडे कंगणासाठी जोरदार धक्का देणारे असल्याचेही बोलले जात आहे. कारण अभिनेत्री कंगणा राणौतचा हा सलग ९वा फ्लॉप चित्रपट ठरला आहे.धाकड चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट ८०- ९० कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांना हा चित्रपट सुपरहीट होणार असल्याचा विश्वास असल्याने त्यांनी ओटीटी हक्क विकले नव्हते. मात्र आता चित्रपट सुपर फ्लॉप ठरल्याने ओटीटी फ्लॅटफॉर्मवरही हक्क विकायला अडचणी निर्माण होत आहेत. या चित्रपटाने आत्तापर्यंत ४ कोटीची कमाई केली आहे. या सगळ्या आकड्यांवरुन चित्रपटाने निर्मात्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच अभिनेत्री कंगणा रणौतलाही सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा