Tuesday, June 6, 2023

जुगजुग जियो | कियारा- वरुणचे वादग्रस्त ‘नच पंजाबन’ गाणे रिलीझ, नववधूच्या वेशात दिसल्या नीतू कपूर!

कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांच्या आगामी ‘जुगजुग जियो’ चित्रपटातील ‘नच पंजाबन’ हे गाणे शुक्रवारी (२७ मे) रिलीझ झाले. हे या चित्रपटाचे पहिले गाणे आहे, जे रिलीझ झाले आहे. ‘नच पंजाबन’ हे एक पार्टी साँग आहे. गाण्याच्या रिलीझसाठी आदल्या दिवशीच कियारा- वरुन राजधानी दिल्लीत आले होते आणि इथेच त्यांनी गाणे रिलीझ केले.

‘जुग जुग जियो’मधील ‘नच पंजाबन’ या गाण्यात कियारा आणि वरुणसोबत नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि अनिल कपूरही (Anil Kapoor) डान्स करताना दिसत आहेत. गाण्यात नीतू नववधूसारख्या दिसत आहेत. त्याचवेळी कियारा आणि वरुण त्यांना डान्स फ्लोरवर परफॉर्म करण्यास विनंती करत आहेत. हे गाणे गिप्पी ग्रेवाल, झाहरा एस खान, तनिष्क बागची आणि रोमी यांनी गायले आहे. तर तनिष्क बागची आणि अबरार उल हक यांनी संगीत आणि गीत दिले आहे. निर्मात्यांनी या गाण्याचे श्रेय पाकिस्तानी गायक अबरार-उल-हकला दिले आहे, कारण हे गाणे त्याच्या अल्बममधूनच घेतले गेले आहे. (jugjugg jeeyo controvercial song nach punjaabban finally released)

नुकतेच या चित्रपटातील ‘नच पंजाबन’ या गाण्यावरून बराच वाद झाला होता. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आणि त्यामध्ये गाण्याची एक छोटीशी झलक शेअर करण्यात आली होती. यावर पाकिस्तानी गायक अबरार-उल-हकने आक्षेप घेतला होता आणि निर्माता करण जोहरवर (Karan Johar) गाणे चोरल्याचाही आरोप केला होता. मात्र, नंतर निर्मात्यांनी गाण्याचे सर्व कायदेशीर दस्तऐवज शेअर केले आणि २००२ मध्येच त्याचे हक्क विकत घेण्याबद्दल सांगितले. त्यानंतर या गाण्यावरील वाद संपुष्टात आला.

‘जुग जुग जियो’ चित्रपटाची निर्मिती करण जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम १८ यांच्या बॅनरखाली होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. कौटुंबिक ड्रामा आणि भावनांनी भरलेला हा चित्रपट २४ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा