कंगना राणावत ही नेहमीच तिच्या बोलण्यामुळे आणि तिच्या ट्विट्समुळे अनेक वाद ओढवून घेत असते. शिवाय ती अगदी दररोजच ट्विट केल्यामुळे चर्चेत असते. महाराष्ट्र सरकार, दिलजीत दोसांज, उर्मिला मातोंडकर अशा अनेक व्यक्तीवर कंगना नेहमीच ट्विट करत त्यांच्यावर टीका करत असते. कंगनाने गेल्या काही दिवसांपासून तापसी पन्नूला धारेवर धरले आहे. तापसीच्या नवीन फोटोशूटवरून कंगनाने तापसीला तिची मोठी फॅन असल्याचे सांगितले आहे.
तापसीने नुकतेच एका मासिकासाठी फोटोशूट केले. या फोटोशूटच्या एका फोटोवरून कंगनाने तापसीला कॉपी केल्याचे म्हटले आहे. तापसीने कंगनाची एक पोज कॉपी केली असल्याचे कंगनाची म्हणणे आहे. कंगनाने तिच्या एका फॅनचे ट्विट रिट्विट करत लिहिले आहे की, ” हा हा हा, मी खूप खूश आहे. हीच माझी खरी प्रशंसक आहे. हिने तिच्या जीवनाचे उद्देश ठरवले आहे की, मला कॉपी करणे. ही गोष्ट मला खूप प्रभावित करून जात आहे. सोबतच कोणत्याच महिला सुपरस्टारने पॉप संस्कृतीवर असे राज्य केले नाही जसे मी करते. मिस्टर बच्चन यांच्यानंतर मीच अशी सुपरसत्र आहे जिला सर्वात जास्त कॉपी केले जाते.”
https://twitter.com/Arzitasingh07/status/1347865792029757440?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347924457768300546%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fentertainment%2Fbollywood-news%2Fstory%2Ftaapsee-pannu-tweets-about-jealousy-kangana-ranaut-replies-i-dont-want-to-exist-in-this-world-tmov-1190325-2021-01-11
कंगनाच्या या ट्विट नंतर काही वेळातच तापसीने एक ट्विट केले आहे. कंगनाच्या या ट्विटला तापसीने नाव न घेता सडेतोड उत्तर दिले आहे. तापसीने तिच्या ट्विटमध्ये अमेरिकन लेखक Robert A. Heinlein यांच्या एका विचाराची इमेज पोस्ट केली आहे. त्यात लिहिले आहे की, ” एक सक्षम आणि आत्मविश्वासू व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा हेवा करण्यास असमर्थ असतो. ईर्ष्या हे न्यूरोटिक असुरक्षिततेचे लक्षण आहे.”
#ThoughtOfTheDay actually almost everyday now 🙂 pic.twitter.com/Eddkepc1Mx
— taapsee pannu (@taapsee) January 10, 2021
तापसीने या पोस्ट म्हणून नाव न घेता कंगनाला जशास तसे उत्तर दिले आहे. आता कंगनाला उद्देशून केलेल्या ट्विटला उत्तर न देणारी कंगना कसली? तिने लगेच तापसीच्या पोस्टला कमेंट करताना लिहिले, ” या जिनियस समोर माझे काय भविष्य आहे असा विचार करून मी खूप घाबरते आणि जळते. दुसऱ्यांचे तर माहित नाही पण मी तर नक्कीच अशा जगात राहू शकत नाही ज्या जगात हिच्या सारखी आर्ट, ब्युटी आणि टॅलेंटची सुपरनोवा राहत आहे.”
????????????. #SastiCopy pic.twitter.com/oFObfEr1jl
— POOJA SHARMA (@Poojash69665899) January 10, 2021
कंगना आणि तापसीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर कंगनाने नुकतेच तिच्या ‘थलाइवी’ या जयललिता यांच्या बायोपिकचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता कंगना तिच्या दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
तर तापसीकडे चित्रपटाची भरपूर मोठी रांग आहे. तापसी शाबाश मिठू, रश्मि रॉकेट, लूप लपेटा, हसीन दिलरुबा याचित्रपटांमध्ये दिसणार आहे.