Tuesday, August 5, 2025
Home अन्य ड्रेसिंग सेन्सवर ट्रोलर्सला कंगनाने शिकवला धडा; म्हणाली, ‘मी काय घातले पाहिजे काय नाही…’

ड्रेसिंग सेन्सवर ट्रोलर्सला कंगनाने शिकवला धडा; म्हणाली, ‘मी काय घातले पाहिजे काय नाही…’

बॉलिवूडची दंगल गर्ल कंगना रनौत नेहमी आपल्या वक्तव्यामुळे आणि फॅशेनमुळे ओळखली जाते. कंगना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती सध्या राजकारणात आपले नशीब आजमावत आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. कंगना आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतंच तिने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे कंगनाला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मात्र, अभिनेत्रीही उत्तर देण्यास मागे नाही.

कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती रजनीश घई (Kazneesh Ghai) याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहे. या फोटोला शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “चीफ रजनीश भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” या फोटोमध्ये कंगनाने स्लीवलेस ड्रेस ट्रांसपेरेंट टॉप आणि मैचिंग ट्राउजर घातले आहे. मात्र, तिच्या चाहत्यांना तिचा असा पेहराव आवडला नाही त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. मात्र, अभिनेत्रीही शांत बसणाऱ्यातली नाही. तिला चांगलेच माहीत आहे की, ट्रोलर्सला खशा प्रकारे उत्तकरं द्यायची.

kangna ranaut

कंगनानेही ट्रोलर्सला सडेतोड उत्तरे देत त्याच आउटफीटमधील अजून फोटो शेअर त्यांना चांगल्याच खनकदार शब्दात ऐकवले आहे. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे होते की, “फक्त याच गोष्टीवर जोर देयचा आहे की, एका मुलीने कोणते कपडे घातले पाहिजे आणि कोणते नाही ही तिची मर्जी असते, यावर तुमचं काहीच घेनं देनं नाही. याशिवाय तिने अजून अक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, मला वाटत आहे की, मी माझे मत मांडले आहे. त्यामुळे मी आता कामावर जाऊ शकते.”

kangna ranaut

कंगना आपल्या वक्तव्यामुळे अनेकदी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती, एककवेळेस तर तिचे घर देखिल तोडले होते. मात्र, तरीही ती नेहमी आपले मत बेधडक मत मांडत असते. ती बॉलिवूडवरही मोकळेपणाने टीकी करत असते. कंगनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर, ती वलकरच पिरिएड ड्रामा इमरजेंनसी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये महिमा चौधरी (mahima chaudhary), अनुपम खेर (anupam kher) वाशाल नायक (vishal nayak), आणि श्रेयस तळपडे (shreyas talpade) सारखे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
कमाईच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या सनीने ‘या’ कारणामुळे घेतला होता दोन अभिनेते असलेले सिनेमे न करण्याचा निर्णय
‘मंजिल मंजिल’ सिनेमात डिंपलसोबत काम करण्यास कुणी तयार नसताना सनीने दिली होती साथ

हे देखील वाचा