Monday, April 28, 2025
Home बॉलीवूड कंगना आज जे बोललीये ते वाचून तुम्हीही तिचं कौतुक कराल, लतादिदींशी आहे संबंध

कंगना आज जे बोललीये ते वाचून तुम्हीही तिचं कौतुक कराल, लतादिदींशी आहे संबंध

कंगना रणौत नेहमीच तिच्या परखड आणि स्पष्ट मतांसाठी ओळखली जाते. तिच्या अशा स्वभावामुळे ती नेहमीच वादांमध्ये देखील पडताना दिसते. मात्र असे असूनही ती काही तिचा स्वभाव सोडत नाही. तिचे मत ती अधिक कणखर होऊन जगासमोर मांडते. नुकताच संपूर्ण जगातील संगीत विश्वासाठी अतिशय मानाच्या समजला जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा संपन्न झाला. संगीत क्षेत्रातला हा सर्वात मोठया आणि अतिशय मानाचा पुरस्कार मानला जातो. १९५४ साली अमेरिकेत या पुरस्काराची सुरुवात झाली होती. त्यानंतर दरवर्षी संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकरांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. मात्र यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतरत्न आणि संपूर्ण संगीतविश्वासाठी पूजनीय असलेल्या लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण न केल्यामुळे भारतातून या सोहळ्यावर रोष व्यक्त केला जात आहे.

लॉस वेगासमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात रिकी केज आणि फाल्गुनी शाह या दोन संगीतकारांना ग्रॅमीने सन्मानित करण्यात आले. मात्र लता दीदींना श्रद्धांजली न वाहिल्यामुळे भारतीय लोकांचा राग सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येताना दिसत आहे. आता यावर अभिनेत्री कंगन रणौतने देखील तिचा राग व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये याबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. तिने तिच्या पोस्टमधून ग्रॅमी पुरस्कारावर चांगलेच ताशेरे ओढले. कंगनाने एका न्यूज आर्टीकल्च स्क्रिनशॉट शेअर करत या पुरस्काराला बॉयकॉट करण्याचे सांगितले. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “आपल्याला कोणत्याही लोकल पुरस्काराबद्दल अधिक कठोर भूमिका घ्यावी लागेल. जे आंतरराष्ट्रीय होण्याचा दावा करतात आणि तरी देखील दिग्गज कलाकरांना दुर्लक्षित करतात. मुद्दाम देखील असे होते. ऑस्कर आणि ग्रॅमी दोन्ही पुरस्कार भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देण्यामध्ये अपयशी ठरले. आपल्या मीडियाने असे वैश्विक पुरस्कार होण्याचा दावा करणाऱ्या पक्षपाती लोकल आयोजकांचा बहिष्कार केला पाहिजे.”

कंगना रणौत आधी अनेक नेटकाऱ्यानी सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रॅमी पुरस्कारांना फटकारले. ग्रॅमी आधी ऑस्करने देखील त्यांच्या २०२२ च्या पुरस्कारांमध्ये ‘इन मेमोरियम’ या सेगमेंटमध्ये लता मंगेशकर यांचे नाव सामील केले नव्हते. तेव्हा देखील भारतीयांनी त्यावर राग व्यक्त केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा