Saturday, January 18, 2025
Home बॉलीवूड व्हिडिओ : करीना कपूरच्या कारने पॅपराजीला दुखापत, अभिनेत्री काढला तिच्या ड्राइवरवर राग

व्हिडिओ : करीना कपूरच्या कारने पॅपराजीला दुखापत, अभिनेत्री काढला तिच्या ड्राइवरवर राग

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या कारला नुकताच अपघात झाला. मलाइकाला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर अर्जुन कपूर, करीना कपूरसह त्याचे सर्व मित्र मलायकाची प्रकृती जाणून घेण्यासाठी तिच्या घरी पोहोचले. नुकतीच करीना कपूर मलायका अरोराच्या घरी भेटण्यासाठी पोहोचली, तेव्हा अभिनेत्रीचा फोटो काढण्याच्या प्रयत्नात पॅपराजी करिनाच्या कारने जखमी झाले.

या घटनेनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये करीना तिच्या ड्रायव्हरला मागे हटण्यास सांगत आहे. व्हिडिओमध्ये करीना मलायकाच्या घरातून बाहेर पडत होती. त्यानंतर अचानक पॅपराजी व्हिडिओमध्ये ओरडायला लागतो – माय लेग, माय लेग. यानंतर करीना टेक केअर मॅन म्हणते आणि तिच्या ड्रायव्हरला कार उलटायला सांगते. करिनाच्या या केअरिंग स्टाइलचे लोक कौतुक करत आहेत.

अलीकडेच मलायकाच्या कारला पुण्याहून परतत असताना अपघात झाला. तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून तिला काल सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर कसा तरी तिला घरी घेऊन गेला.

करिनाबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. याआधी ती अनेक चित्रपटात दिसली आहे. परंतु मागील काही दिवसापासून ती चित्रपटात दिसली नाही. तिने काही महिन्यनपूर्वी तिच्या दुसरी मुलाला जन्म दिला आहे. तिचा पहिला मुलगा हा स्टारकीड म्हणून खूप चर्चेत असतो. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. तिने आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव जेह असे ठेवले आहे. सैफ अली खानचे करिनासोबतचे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न अमृता सिंगसोबत झाले होते. परंतु काही कारणाने त्याचा घटस्फोट झाला. त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. सारा देखील आता चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा