Wednesday, July 3, 2024

‘पंतप्रधान मोदींमुळे…’;महिला आरक्षण विधेयकावर केलेल कंगना रणौतचे वक्तव्य चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (19 सप्टेंबर) महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले. ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) या नावाने हे विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडले आहे. या विधेयकात लोकसभेत आणि राज्यसभेत महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद आहे. या विधेयकावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री कंगना रणौतने या विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे.

कंगणाने ट्विटरवर (Kangana Ranaut Tweets)  लिहिले की, “महिलांसाठी 33% आरक्षण हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळेल. मी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचे अभिनंदन करते.” कंगना रणौतने यापूर्वीही महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे. तिने अनेकदा महिलांना राजकारणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

महिला आरक्षण विधेयक हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. 2010 मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने राज्यसभेत हे विधेयक मंजूर केले होते; मात्र, लोकसभेत त्याला विरोध झाला होता. आता पंतप्रधान मोदींच्या सरकारने हे विधेयक पुन्हा मांडले आहे. हे विधेयक जर मंजूर झाले तर भारतात लोकसभेत आणि राज्यसभेत महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद होईल. यामुळे महिलांना राजकारणात अधिक सक्रिय सहभागी होता येईल.

यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कंगनाशिवाय अभिनेत्री ईशा गुप्ताने देखील यावर तिचे मत मांडले आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “पीएम मोदींनी केलेले हे एक सुंदर काम आहे. ही एक अतिशय प्रगतीशील कल्पना आहे. या आरक्षण विधेयकामुळे महिलांना समान अधिकार मिळतील. हे आपल्या देशासाठी एक मोठे पाऊल आहे. पंतप्रधान मोदींनी हे आश्वासन दिले. आणि ते पूर्णही केले…” (Kangana Ranaut reaction to the Women’s Reservation Bill)

अधिक वाचा-
‘या’ पठ्याने थेट दिली उर्फीला टक्कर; अभिनेत्रीने केला शर्टपासून ड्रेस तयार, चाहत्याने चक्क पॅन्ट….
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वयाच्या चाळिशीतही मलायका अरोराचा जलवा, फोटो पाहून हरपेल भान

हे देखील वाचा