Monday, September 25, 2023

‘या’ पठ्याने थेट दिली उर्फीला टक्कर; अभिनेत्रीने केला शर्टपासून ड्रेस तयार, चाहत्याने चक्क पॅन्ट….

उर्फी जावेद हे आजकालचे सर्वाधिक चर्चेत असलेले नाव. तिचा बोल्ड आणि अनोखे लूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. उर्फीने तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या लूकमुळे लोकप्रियता मिळवली आहे. उर्फी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिच्या इंस्टाग्रामवर 4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिचे बोल्ड आणि अनोखे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

उर्फी (Urfi Javed) सतत वेगवेगळ्या वस्तूंन पासून कपडे बनवत असते. पण आता आणखी एक व्यक्ती उर्फीला टक्कर देत आहे. हुजे नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने उर्फी स्टाईलमध्ये स्वतःची फॅशन सेन्स तयार केली आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने अनेक शर्ट एकत्र करून वेगळ्या प्रकारचे ड्रेस बनवले होते. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by José Covaco (@hoezaay)

 यावर एका व्यक्तीने अभिनेत्रीला टक्कर देण्यासाठी असा व्हिडिओ बनवला, जो पाहून उर्फीही हसू आवरले नाही. या व्यक्तीने अनेक पॅन्ट एकत्र घालून उर्फीचे स्टाइल स्टेटमेंट कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. उर्फीने या व्हिडिओवर ‘पँट चोरणे’ अशी कमेंट केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, “अरे हा मुलगा आता उर्फी जावेद हिचे मार्केट कमी करतो.” तर दुसऱ्याने लिहिले की, आता उर्फी जावेद हिचे काय होणार?

 

View this post on Instagram

 

A post shared by José Covaco (@hoezaay)

उर्फीच्या भविष्याबद्दल बोलायचे झाले तर, ती एक यशस्वी अभिनेत्री आहे. उर्फीचा जन्म 15 ऑक्टोबर 1997 रोजी लखनऊ येथे झाला. तिने लखनऊच्या सिटी मोंटेसरी स्कूलमधून शाळा पूर्ण केली आणि नंतर नोएडाच्या अमिटी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. उर्फीने 2021 मध्ये “बिग बॉस ओटीटी” मध्ये भाग घेतला. या शोमध्ये तिने तिच्या बोल्ड लूक आणि बिनधास्तपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शोनंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली. (The person has tried to copy Urfi style statement by putting together several pants whose video is going viral on social media)

आधिक वाचा-
“आमच्या घरी गणपती बसत नाही..”, क्रांतीने शेअर केला जुळ्या लेकींचा ‘तो’ व्हिडिओ, चाहते म्हणाले…
‘मी जिंवत..,’ असं म्हणत BTS ग्रुपच्या ‘या’ गायकाने संगीत जगताला ठोकला रामराम, आता देशासाठी…

हे देखील वाचा