कंगना राणावत आणि महाराष्ट्र सरकार यांचे वाद आता नवीन नाही. मागील अनेक महिन्यांपासून कंगना आणि ठाकरे सरकार यांचा वाद चर्चेचा विषय बनला आहे. कंगना राणावत हिला न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. घरांचे अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.
यावर कंगनाने तिची बाजू मांडत एक ट्विट केले आहे, “महाविनाशकारी सरकारचा माझ्याविरोधात चुकीचा प्रचार, मी कोणतेही बांधकाम केले नाहीये, पूर्ण बिल्डिंग अशीच आहे, एका मजल्यावर एक फ्लॅट. मी जसे ते घर होते असेच घेतले आहे. महानगरपालिका या पूर्ण बिल्डिंगमध्ये फक्त मलाच त्रास देत आहे. मी हायकोर्टात जाऊन लढेल.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1345231896268001280?s=20
काय आहे प्रकरण:
कंगनाच्या मालकीचे खार पश्चिम येथील ऑर्किड ब्रीझ या १६ मजली इमारतीतील पाचव्या मजल्यावर तीन घरं आहेत. एकाच मजल्यावर असलेले हे तीन घरं तोडून तिने एकच मोठे घर तयार केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. असे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तिने न घेताच अनधिकृत बांधकाम केले असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले होते. मूळ बांधकामात फेरफार, अंतर्गत बदल आणि जास्तीचे बांधकाम अशी नियमबाह्य आणि बेकायदा बांधकामे कंगनाने केली असल्याचा आरोप करत तिला महानगरपालिकेने एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३(१) अंतर्गत मार्च २०१८ मध्ये नोटीस बजावली होती. त्यानंतर हा वाद कोर्टात पोहचला. न्यायालयाने या खटल्यामध्ये कंगनाने तिच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचं न्यायालयाने म्हटले होते.
कोर्टाने कंगनाला या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. जर कंगनाने सहा आठवड्यांच्या आत उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले नाही, तर कंगनाने केलेल्या अनधिकृत बांधकामाला पडण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती.
कंगना नुकतीच १०५ दिवसांनंतर पुन्हा मुंबईत परतली आहे. तिने मुंबईत आल्या आल्या महाराष्ट्रीयन पेहरावात सिद्धिविनायक मंदिर आणि मुंबादेवी यांचे दर्शन घेतले.