×

Lock Up | बोल्ड कपडे घालून पुरुषांची दिशाभूल करणाऱ्या अभिनेत्राला अटक, व्हिडिओतून झाला खुलासा

अत्यंत हॉट कपडे घालून आणि किलर स्टाईलने रस्त्यावरून चालणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेचा गुन्हा एवढाच आहे की, ती रिवीलिंग कपडे घालून देशातील पुरुषांची दिशाभूल करत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमधून ही बाब समोर आली आहे.

बोल्ड कपडे घालून रस्त्यावर झाली स्पॉट
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, केशरी रंगाची बिकिनी आणि लॉग टाइट स्कर्ट घातलेली एक महिला रेस्टॉरंटमध्ये जात आहे. यात तिची चाल आणि अदा इतकी कातिलाना आहे की, तिला पाहून आजूबाजूच्या लोकांना नशा चढत आहे. इतकेच नव्हे, तर लोक तिला पुन्हा पुन्हा पलटून बघत आहेत. (kangana ranaut reality show lock upp hot video viral actress arrest wearing bold clothes)

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

मागत होती स्टीम हॉट कॉफी
ही एक अभिनेत्री आहे, जी रेस्टॉरंटमध्ये येते आणि खुर्चीवर बसते. ती स्टीम हॉट कॉफी ऑर्डर करते. अभिनेत्रीने ऑर्डर देताच, पोलिस तिला अटक करण्यासाठी तिथे पोहोचतात. पोलिस अभिनेत्रीला म्हणतात की, “जी ऑर्डर द्यायची आहे, ती पोलिस चौकीत जाऊन द्या.” यानंतर अभिनेत्री म्हणते, “मी काय गुन्हा केला आहे?” प्रत्युत्तरात पोलिस म्हणतात की, “तुमच्यावर अत्यंत हॉट असल्याचा आरोप आहे.” प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणते की, “हॉट असणं म्हणजे गुन्हा आहे का?” यानंतर पोलिस म्हणतात की, “तुमच्यावर देशातील पुरूषांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.”

काय आहे संपूर्ण प्रकरण
खरं तर, हा व्हिडिओ बहुप्रतिक्षित रियॅलिटी शो ‘लॉक अप’चा आहे. या शोमध्ये १५ ते १६ स्पर्धकांना लॉक अपमध्ये ठेवण्यात येणार आहे. ज्यांना शोची होस्ट कंगना रणौतचे नियम पाळावे लागतील. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘धाडस हीच हिची ओळख आहे, ही लावते इंटरनेटवर आग, तुम्ही ओळखू शकाल का?” आता प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा-

हेही पाहा-

Latest Post